advertisement

BJP On Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोराचे भाजप कनेक्शन, बावनकुळे म्हणतात, ''दीपक काटे हा...''

Last Updated:

BJP On Pravin Gaikwad Case : दीपक काटेचे भाजप कनेक्शन आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अखेर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी त्यावर भाष्य केले.

प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोराचे भाजप कनेक्शन, बावनकुळे म्हणतात,  ''दीपक काटे हा...''
प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोराचे भाजप कनेक्शन, बावनकुळे म्हणतात, ''दीपक काटे हा...''
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूरमधील अक्कलकोटमध्ये रविवारी शाईफेक करून हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला. त्यानंतर दीपक काटेचे भाजप कनेक्शन आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अखेर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी त्यावर भाष्य केले.
गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजातील तरुणांना अहद कॅनडा ते तहद ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून उद्योगाची वाट दाखविणारे, पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "हा प्रकार निंदनीय आहे. आणि अशा खालच्या दर्जाचे कृत्य करणे भाजपच्या संस्कृतीत नाही," असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, "या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात असले, तरी आमचा पक्ष अशा प्रकारांना पाठिशी घालत नाही. भाजपचा या हल्ल्याशी कोणताही संबंध नाही."
advertisement
राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी पुढे म्हणाले, "कोणताही आरोपी हा कोणत्याही पक्षाचा असो, तो आरोपीच असतो. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी." त्यांनी पोलिस प्रशासनाला योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आवाहन केले.

सात जणांविरोधात गुन्हे दाखल...

दीपक काटे याच्यासह 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे, किरण साळुंखे, भैया ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी, भवानेश्वर शिरगिरे यांच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी हल्लेखोरांविरोधात पोलिसांत फिर्याद दिली.
advertisement

कोण आहे दीपक सिताराम काटे ?

दीपक सिताराम काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आहे. दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे. त्याने 2022 मध्ये भाजपात प्रवेश बारामतीत केल्यानंतर 26 मार्च 2023 रोजी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या 52 शाखेचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केले होते.
advertisement
पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काढतूसे सापडले होती. त्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षात चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखले जाते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP On Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोराचे भाजप कनेक्शन, बावनकुळे म्हणतात, ''दीपक काटे हा...''
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement