Traffic Update: दिघा गावातील वाहतुकीत मोठे बदल, प्रवासाचा वेळ वाढणार, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Traffic Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रबाळे वाहतूक शाखेच्या हद्दीत दिघा गाव येते.
नवी मुंबई : ऐरोलीपासून जवळ असलेल्या दिघा गावातील वाहतूक व्यवस्थेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिघा गावातील तलावापासून स्मिथ हॉटेलपर्यंतचा रस्ता 22 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याठिकाणी पार्किंग केन आणि लिफ्टिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे तलाव ते स्मिथ हॉटेल या मार्गावर आपत्कालीन वाहनं वगळता अन्य वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबई वाहतूक पोलीस शाखेने याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रबाळे वाहतूक शाखेच्या हद्दीत दिघा गाव येते. या गावात बुधवारपासून पार्किंग केन आणि लिफ्टिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा रस्ता हा 17 ते 22 सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. अग्निशमन दल, पोलीस वाहन, रुग्णवाहिकांना मात्र या अधिसूचनेतून वगळण्यात आलं आहे.
advertisement
असे असतील पर्यायी मार्ग
1) वाशीकडून रबाळे एमआयडीसीमध्ये प्रवेश करणारी सर्व प्रकारची अवजड व हलकी वाहने रबाळे नाका सिग्नल येथून उजव्या बाजूला वळून रबाळे एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.
2) ठाण्याकडून रबाळे एमआयडीसीमध्ये येणारी सर्व वाहनं मुकुंद कट येथून डाव्या बाजूला वळून रामनगर मार्गे रबाळे एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.
advertisement
3) दुचाकी व चार चाकी वाहनं रिलायबल प्लाझा विष्णुनगर, यादवनगर, इलठणपाडा रबाळे एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.
4) दुचाकी व चारचाकी वाहनं गवतवाडी पॉवर हाउस येथून विष्णुनगर, यादवनगर, इलठणपाडा रबाळे एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 18, 2025 10:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Traffic Update: दिघा गावातील वाहतुकीत मोठे बदल, प्रवासाचा वेळ वाढणार, पर्यायी मार्ग कोणते?