Local Update: मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा होणार, 'या' मार्गावरील लोकल राहणार बंद, कारण काय?

Last Updated:

Local Update: सप्टेंबर महिन्यात एकूण चार दिवस कर्जत ते खोपोली, नेरळ ते खोपोली लोकल केल्या जाणार आहेत.

Local Update: मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा होणार, 'या' मार्गावरील लोकल राहणार बंद, कारण काय?
Local Update: मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा होणार, 'या' मार्गावरील लोकल राहणार बंद, कारण काय?
मुंबई: कर्जत आणि खोपोलीहून अनेक प्रवासी दररोज मुंबई आणि नवी मुंबईत येण्यासाठी लोकलचा वापर करतात. अशा प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील कर्जत स्टेशनवर यार्ड रीमॉडेलिंगचं काम हाती घेतलं जाणार आहे. या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी 18, 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत ते खोपोली, नेरळ ते खोपोली लोकल केल्या जाणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटीहून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 14 मिनिटांपर्यंत कर्जतला जाणाऱ्या लोकल नेरळपर्यंत चालतील. कर्जतहून सकाळी 11.19 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल नेरळ येथून सुटतील.
advertisement
22 सप्टेंबर रोजी दुपारी 12.25 ते दुपारी 1.55 वाजेपर्यंत कर्जत ते खोपोलीदरम्यान आणि 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 1.50 वाजेपर्यंत नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द असतील. बुधवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 1.20 आणि दुपारी 1.20 ते दुपारी 3.20 पर्यंत अप, डाऊन आणि मध्य मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
advertisement
18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत घेतल्या जाणाऱ्या ब्लॉक कालावधीत कोइम्बतूर-एलटीटी एक्सप्रेस ही गाडी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 5 मिनिटांपर्यंत लोणावळा येथे थांबवण्यात येईल. चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस आणि चेन्नई-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस देखील दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनंतर नंतर लोणावळा येथून मार्गस्थ होतील. यावेळेत नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल बंद राहतील.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Update: मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा होणार, 'या' मार्गावरील लोकल राहणार बंद, कारण काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement