‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वर ओळख, छ. संभाजीनगरला बोलावलं अन्..., बीडच्या महिलेसोबत भयंकर घडलं

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेल मॅनेजरने बीडमधील घटस्फोटीत महिलेवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केले. याबाबत महिलेने तक्रार दाखल केली आहे.

ऑनलाईन ओळख अन् लग्नाचं आमिष, दुसऱ्याच दिवशी केला घात, बीडच्या महिलेसोबत...
ऑनलाईन ओळख अन् लग्नाचं आमिष, दुसऱ्याच दिवशी केला घात, बीडच्या महिलेसोबत...
छत्रपती संभाजीनगर : आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आज लाखो महिला-पुरुष ऑनलाइन मॅट्रिमोनियल संकेतस्थळांचा आधार घेतात. पण ‘सात जन्मांची साथ’ सांगत सुरू होणाऱ्या काही ओळखी शेवटी विश्वासघात, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगपर्यंत पोहोचल्याच्या धक्कादायक घटना वाढताना दिसत आहेत. अशाच एका घटनेत बीड येथील 36 वर्षीय महिलेची छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल मॅनेजर भूषण गायधनी याने लग्नाचे खोटे आश्वासन देत फसवणूक केली, अत्याचार केले आणि गर्भपातास भाग पाडले, असा आरोप महिलेने केला आहे. तसेच या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‎पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला स्वाती (नाव बदललेले, काल्पनिक) ही 2016 पासून वैवाहिक वादानंतर विभक्त राहत होती. योग्य जीवनसाथीच्या शोधात ती 2019 मध्ये एका लोकप्रिय मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर सक्रिय झाली. याचदरम्यान भूषण गायधनीसोबत तिची ऑनलाइन ओळख झाली.
advertisement
‎सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने तिच्या मुलाला स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगून “सर्व जबाबदारी निभावेल, लग्न करू” असे आश्वासन दिले. या शब्दांवर विश्वास ठेवून 21 डिसेंबर 2024 रोजी साक्षीने नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र विश्वास संपादन होताच दुसऱ्याच दिवशी 22 डिसेंबर 2024 रोजी आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार बीडला येत असे किंवा तिला छत्रपती संभाजीनगर येथे भेटण्यासाठी बोलावत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
advertisement
‎लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागला आणि त्यानंतर धमक्या, शिवीगाळ तसेच मानसिक दबाव वाढत गेला. मे 2025 मध्ये साक्षी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर तिने लग्नाचा आग्रह धरला असता, 3 जून 2025 रोजी सिडको भागातील एका खासगी रुग्णालयात तिला नेऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप तिने केला आहे. गर्भपातानंतरही आरोपीकडून शारीरिक, मानसिक छळ सुरूच होता, असेही तक्रारीत नमूद आहे.
advertisement
‎ऑक्टोबर 2025 मध्ये पीडितेने विरोध तीव्र केला असता, 31 ऑक्टोबर रोजी भूषण गायधनी याने “मी तुला ओळखत नाही, माझ्यापासून दूर राहा” असे म्हणत संबंध झटकून टाकले. शिवाय तिचे खासगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची, नोकरी गमवून देण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
advertisement
‎7 नोव्हेंबर 2025 रोजी तिने शेवटचा प्रयत्न म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने प्रत्यक्ष न भेटता फोनवरूनच तिला धमकावल्याचा दावा तिने केला आहे. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वर ओळख, छ. संभाजीनगरला बोलावलं अन्..., बीडच्या महिलेसोबत भयंकर घडलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement