advertisement

चिमुकलीचा रडण्याचा आवाज, शेजाऱ्यांनी धाव घेतली, सावत्र बापच..., छ. संभाजीनगरात संतापजनक प्रकार

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: मुलीचा जोरदार रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक महिला आणि नागरिकांनी तत्काळ घराकडे धाव घेतली.

चिमुकलीचा रडण्याचा आवाज, शेजाऱ्यांनी धाव घेतली, सावत्र बापच..., छ. संभाजीनगरात संतापजनक प्रकार
चिमुकलीचा रडण्याचा आवाज, शेजाऱ्यांनी धाव घेतली, सावत्र बापच..., छ. संभाजीनगरात संतापजनक प्रकार
छत्रपती संभाजीनगर : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. ज्या घरात सुरक्षिततेची अपेक्षा असते, त्याच घरात सावत्र पित्याने अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
‎वाळूज येथील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत 7 ते 9 वर्षे वयोगटातील मुलीवर तिच्याच सावत्र वडिलांकडून शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आर्त आरडाओरडीनंतर हा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आला. मुलीचा जोरदार रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक महिला आणि नागरिकांनी तत्काळ घराकडे धाव घेतली.
advertisement
‎घरात प्रवेश केल्यानंतर मुलगी अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. तिच्या पाठीवर, हातांवर आणि पायांवर चटक्यांचे सुमारे 8 ते 10 वण दिसून आले. या जखमा पाहून उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही शेजाऱ्यांनी हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
‎घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. संबंधित सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. त्याच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
advertisement
‎दरम्यान, काही शेजाऱ्यांनी मुलीच्या आईवरही आरोपीला साथ दिल्याचा आरोप केला आहे. पोलिस या सर्व बाबींची सखोल चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीवरील या अमानुष प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चिमुकलीचा रडण्याचा आवाज, शेजाऱ्यांनी धाव घेतली, सावत्र बापच..., छ. संभाजीनगरात संतापजनक प्रकार
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement