advertisement

बारावीच्या फिजिक्स-केमिस्ट्रीचा पेपर फुटला! नागपुरात विद्यार्थिनीच्या चुकीमुळे फुटलं बिंग

Last Updated:

नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर तासाभरापूर्वी फुटले, एका कोचिंग क्लासेस शिक्षकाने पैशांसाठी पेपर लीक केला, पोलिस तपास सुरू.

News18
News18
नागपूर, प्रतिनिधी उदय तिमांडे: बारावीच्या परीक्षेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणारी एक धक्कादायक घटना नागपुरात समोर आली. विज्ञान शाखेचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच फुटल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैशांच्या लालसेपोटी हे कृत्य केल्याचे समोर आलं.
प्रसाधनगृहातील हालचालींनी फुटलं भांडं
हे संपूर्ण प्रकरण नागपूरच्या सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर उघडकीस आले. गुरुवारी केमिस्ट्रीचा पेपर सुरू असताना, एक विद्यार्थिनी वारंवार वॉशरूम जात होती. तिच्या या संशयास्पद हालचालींमुळे तिथल्या पर्यवेक्षकांना संशय आला. त्यांनी महिला शिक्षिकेमार्फत तिची झडती घेतली असता, तिच्याकडे एक स्मार्टफोन सापडला. जेव्हा हा मोबाईल तपासला गेला, तेव्हा उपस्थित सर्वांचेच पाय लटपटायला लागले. त्या मोबाईलमध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच संपूर्ण पेपर आलेला होता.
advertisement
१५ विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि पैशांचा खेळ
पोलीस तपासात समोर आले की, मोबाईलमध्ये एकूण १५ विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता. पकडल्या गेलेल्या विद्यार्थिनीची अधिक चौकशी केली असता, तिने धक्कादायक माहिती दिली. शहरातील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने पैसे घेऊन हा पेपर फोडला होता. विशेष म्हणजे, या ग्रुपमधील इतर १३ विद्यार्थी शहराच्या वेगवेगळ्या केंद्रांवर आरामात पेपर सोडवत होते.
advertisement
पोलिसांची कारवाई आणि गुन्ह्याची नोंद
केंद्रप्रमुखांनी तातडीने सदर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून, त्या शिक्षकाचा आणि पेपर लीक झालेल्या साखळीचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बोर्डाच्या गोपनीयतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
बारावीच्या फिजिक्स-केमिस्ट्रीचा पेपर फुटला! नागपुरात विद्यार्थिनीच्या चुकीमुळे फुटलं बिंग
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement