advertisement

PAK vs NZ : बाबर आझमच्या इज्जतीचा फालुदा! पाकिस्तानच्या हेड कोचनेही सोडलं नाही, स्ट्राईक रेटवरून घेतली शाळा

Last Updated:

Mike Hesson humiliating Babar Azam : बाबर आझम याला 4 च्या क्रमांकावर पाठवलं नाही. त्यामुळे त्याला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. अशातच आता पाकिस्तानच्या हेड कोचने देखील बाबर आझमवर टोला लगावला आहे.

Mike Hesson humiliating Babar Azam
Mike Hesson humiliating Babar Azam
Mike Hesson Press Conference : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने नामीबियाविरुद्ध 100 हून अधिक धावांनी विजय मिळवल्यानंतर आता सुपर 8 साठी मोठी तयारी सुरू केली आहे. या सामन्यात पाकिस्तानने दोन मोठ्या चुका सुधारल्या. शाहीन शाह आफ्रिदी याला बाहेर बसवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे बाबर आझम याला 4 च्या क्रमांकावर पाठवलं नाही. त्यामुळे त्याला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. अशातच आता पाकिस्तानच्या हेड कोचने देखील बाबर आझमवर टोला लगावला आहे.

बाबर आझमच्या स्ट्राईक रेटची खिल्ली

बाबर आझमच्या स्ट्राईक रेटवरून अनेकदा त्याची खिल्ली उडवली जाते. मोठ्या सामन्यात बाबर आझम चांगली कामगिरी करत नाही. बारक्या टीमविरुद्ध नेमका खेळतो. त्यात बाबरचा स्ट्राईक रेट खूप कमी असल्याने नेहमी त्याला टीकेचा धनी व्हावं लागतं. अशातच आता पाकिस्तानचे हेड कोच माइक हेसन यांनी देखील बाबरला चांगलंच सुनावलंय.
advertisement
advertisement

काय म्हणाले हेड कोच माइक हेसन?

बाबर आझमला माहिती आहे की, त्याचा स्ट्राईक रेट 100 हून कमी आहे. त्याच्याकडून जशा कामगिरीची अपेक्षा होती, तसं प्रदर्शन झालं नाहीये. तो मिडल ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी करतोय, युएसएविरुद्ध आपण त्याची कामगिरी पाहिली आहे. एकदा तो पीचवर सेट झाला तर तो मोठी इनिंग खेळू शकतो, असं माइक हेसन यांनी म्हटलं आहे.
advertisement

शाहीन आफ्रिदीला बाहेर का बसवलं?

दरम्यान, शाहीन आफ्रिदीसारख्या अनुभवी बॉलरला बाहेर ठेवण्यामागे केवळ खराब फॉर्म हेच कारण नसून, इतर टॅलेंटला संधी देणे हा देखील उद्देश होता. फास्ट बॉलर सलमान मिर्झाला देखील आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी होती, असे हेसन यांनी मीडियाशी संवाद साधताना आवर्जून नमूद केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर अनेक फॅन्स नाराज असले, तरी हेसन यांनी हा निर्णय धोरणात्मक असल्याचे म्हटले आहे. खेळाडूंच्या भूमिका आणि टीमची गरज ओळखूनच हे बदल करण्यात आले आहेत. आगामी मोठ्या मॅचेससाठी बेंच स्ट्रेंथ तपासावी लागते, असे स्पष्टीकरण मॅनेजमेंटकडून देण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs NZ : बाबर आझमच्या इज्जतीचा फालुदा! पाकिस्तानच्या हेड कोचनेही सोडलं नाही, स्ट्राईक रेटवरून घेतली शाळा
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement