advertisement

खून का बदला खून, शितकल हत्याकांडातील आरोपीची दगडाने ठेचून हत्या, दौंडमधील थरारक घटना!

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील बहुचर्चित शितकल दुहेरी हत्याकांडाचा भीषण सूड घेण्यात आला आहे.

News18
News18
सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील बहुचर्चित शितकल दुहेरी हत्याकांडाचा भीषण सूड घेण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश (मन्या) भागवत याची पांढरेवाडी हद्दीतील झगडेवाडी ब्रिजवर निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जामिनावर बाहेर असलेल्या मनोजची हत्या करून शितकल हत्याकांडाचा बदला घेतल्याची चर्चा संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

काल रात्री मन्या उर्फ महेश भागवत याचा कुरकुंभ जवळील मुकादमवाडी ब्रिजवर निर्घृण खून करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश मारूती टुले (वय 25 वर्षे, धंदा खाजगी व्यवसाय, रा.ठि. तामखडा पाटस, ता. दौंड जि. पुणे) याने फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी- 1) आनंद माकर, 2) विकी शितकल, 3) संतोष शितकल (तिघे रा. आंबीकानगर, पाटस ता. दौंड जि.पुणे) व त्यांचे इतर दोन साथीदार (नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दिनाक २० फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचे माझे मित्र महेश उर्फ मन्या संजय भागवत, युवराज रामदास शिंदे आणि राज होले असे मोटर सायकलवरून पाटसकडे जात होते. सोलापूर पुणे हायवे वरील मुकादमवाडी ब्रिजवर ते आले असता यातील मुख्य सुत्रधार संतोष शितकल याच्या सांगण्यावरून तेथे आनंद माकर आणि विकी शितकल असे दोघांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने सुरवातीला या सर्वांना पाठीमागून पिकअप गाडीने धडक देत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धडक देवून खाली पाडत जखमी केले आणि त्यानंतर फिर्यादी यांचा मित्र महेश उर्फ मन्या संजय भागवत, (वय 29 वर्षे रा. पाटस) याला कोयता आणि सत्तुरने सपासप वार करून जिवे ठार मारले.
advertisement
या घटनेतील मृत हा मागील एका खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार होता अशी चर्चा या परिसरात होत असून त्या खुनाचा बदला म्हणून त्यालाही निर्घृणपणे संपवण्यात आल्याचं बोललं जात आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी (1) आनंद माकर, 2) विकी शितकल, 3) संतोष शितकल व त्यांच्या इतर दोन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.
advertisement

शितकल हत्याकांडाचा पार्श्वभूमी

2021 मध्ये पाटसमध्ये शुभम शितकल आणि त्याच्या मित्राची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात मनोज भागवत हा मुख्य आरोपी होता. या दुहेरी हत्याकांडामुळे पाटस परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मनोज जामिनावर बाहेर आल्यापासून संतापाची लाट होती. याच जुन्या वैमनस्यातून हत्येचा बदला घेण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच दौंड आणि यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पाटस परिसरात पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खून का बदला खून, शितकल हत्याकांडातील आरोपीची दगडाने ठेचून हत्या, दौंडमधील थरारक घटना!
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement