बिबट्यानं सावज हेरलं अन् झडप घातली, पण बैलानं पळवून लावलं, नेमकं घडलं काय?

Last Updated:

Leopard Attack: गोठ्यात बांधलेल्या बैलाने आक्रमक पवित्रा घेत बिबट्यावर झडप घातल्याने बिबट्याने माघार घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

बैलानं वाचवला जीव! सायंकाळची वेळ अन् गोठ्यात शिरला बिबट्या, वासरावर झडप, पण मोठा अनर्थ टळला! (Ai Photo)
बैलानं वाचवला जीव! सायंकाळची वेळ अन् गोठ्यात शिरला बिबट्या, वासरावर झडप, पण मोठा अनर्थ टळला! (Ai Photo)
छत्रपती संभाजीनगर : अलिकडे वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. फुलंब्री तालुक्यातील सांजूळ शिवारात मंगळवारी सायंकाळी बिबट्या थेट शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरला. परंतु, बैलामुळे अनर्थ टळला.
सायंकाळी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सायंकाळच्या 5 वाजेच्या सुमारास एका शेतवस्तीवरील गोठ्यात अचानक घुसून बिबट्याने वासरावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, काही क्षणांमध्येच गंभीर प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
advertisement
ही घटना पंढरीनाथ सांगळे ( गट क्र.246 ) यांच्या शेतातील गोठ्यात घडली. वासरावर बिबट्याने जोरदार हल्ला करत जबड्यावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच गोठ्यात बांधलेल्या बैलाने आक्रमक पवित्रा घेत बिबट्यावर झडप घातल्याने बिबट्याने माघार घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या प्रसंगात वासराचा जीव वाचला असला तरी त्याला गंभीर जखमा झाल्या असून उपचार सुरू आहेत.
advertisement
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी एस. एस. राजपूत व वनमजूर प्रभाकर दारकुंडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत वासराच्या शरीरावर आढळलेल्या दात व नखांच्या खुणांवरून हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर परिसर जंगलालगत असल्याने बिबट्याची हालचाल वाढलेली असून, वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बिबट्यानं सावज हेरलं अन् झडप घातली, पण बैलानं पळवून लावलं, नेमकं घडलं काय?
Next Article
advertisement
BMC Election Results: तुमच्या वॉर्डाचा निकाल कधी? मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांसाठी यंदा मतमोजणीचा 'पाच टप्प्यांचा' फॉर्म्युला!
तुमच्या वॉर्डाचा निकाल कधी? BMCच्या २२७ वॉर्डांसाठी यंदा मतमोजणीचा 'पाच
  • राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वातावरण तापले आहे.

  • द्या, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर

  • मुंबई महापालिकेच्या मतमोजणीबाबत यंदा एक महत्त्वाचा बदल

View All
advertisement