Tree Cutting: छ. संभाजीनगरमधील डॉक्टरला चूक महागात, 20 वर्षांच्या सोनमोहराचा बळी, लाखाचा दंड!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Tree Cutting: झाडांची विनापरवाना तोड म्हणजे केवळ कायद्याचा भंग नव्हे, तर पर्यावरणाशी केलेला अन्याय आहे. त्यामुळे महापालिकेने छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कठोर कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर : ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आपल्याला निसर्गाशी असलेल्या नात्याची जाणीव करून देतात. पण दुर्दैवाने, शहरातील वाढत्या विकासाच्या नावाखाली हे नातं हळूहळू तुटताना दिसतंय. छत्रपती संभाजीनगरात असाच एक प्रकार घडला आहे, जिथे 20 वर्षांपूर्वीचे सोनमोहराचे झाड विनापरवाना तोडल्यामुळे एका डॉक्टरवर मनपाने तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महेशनगर येथील डॉ. स्नेहकुमार सोमानी यांनी काही महिन्यांपूर्वी मनपाच्या उद्यान विभागाकडे झाड तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र परवानगी नाकारल्यानंतरही त्यांनी बांधकामाला अडथळा ठरत असल्याचे कारण देत सोनमोहराचे झाड तोडल्याची तक्रार वृक्ष प्राधिकरणाकडे दाखल झाली. तपासासाठी सहायक उद्यान अधीक्षक नानासाहेब पठाडे यांनी स्थळ पाहणी केली असता झाडतोड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मनपाने संबंधित डॉक्टरवर दंडात्मक कारवाई केली.
advertisement
दरम्यान, सिडको एन-6 भागात असलेल्या एका प्रार्थनास्थळात सात अशोकाची झाडे तोडल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यांना नोटीस देऊन कारणे विचारण्यात आली असता, प्रार्थनास्थळाने चूक मान्य करून दहा नवीन झाडे लावल्याची माहिती दिली. तरीदेखील तीन लाखांचा दंड लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेने सांगितले.
advertisement
सोनमोहर आणि अशोकासारखी झाडे केवळ शोभेची नाहीत, तर शहरातील हवेचा दर्जा सुधारून प्राणवायू देणारी आहेत. अशा झाडांची विनापरवाना तोड म्हणजे केवळ कायद्याचा भंग नव्हे, तर पर्यावरणाशी केलेला अन्याय आहे. त्यामुळे महापालिकेने घेतलेली ही कठोर कारवाई ही ‘हरित संभाजीनगर’ राखण्यासाठी एक जागरूक पाऊल मानले जात आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 15, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Tree Cutting: छ. संभाजीनगरमधील डॉक्टरला चूक महागात, 20 वर्षांच्या सोनमोहराचा बळी, लाखाचा दंड!