नातेवाईकाच्या सांत्वनासाठी गेले, परतताना काळाचा घाला, निवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने यांच्यासह पत्नीचा मृत्यू

Last Updated:

Dr Ram Mane: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने यांचे भीषण कार अपघातात पत्नीसह निधन झाले.

नातेवाईकाच्या सांत्वनासाठी गेले, परतताना काळाचा घाला, डॉ. राम माने यांच्यासह पत्नीचा मृत्यू
नातेवाईकाच्या सांत्वनासाठी गेले, परतताना काळाचा घाला, डॉ. राम माने यांच्यासह पत्नीचा मृत्यू
‎छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने (71) आणि त्यांच्या पत्नी अ‍ॅड. रत्नमाला साळुंके-माने (64) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. कुटुंबाचे सांत्वन करून शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी परतत होते, तेव्हा रस्ता ओलांडताना पडेगाव येथील आर्चआंगणसमोर भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात झाला.
‎माने दांपत्य हे नंदनवन कॉलनीत वास्तव्यास होते. त्यांचे पडेगावच्या देशमुखनगर येथेही निवासस्थान होते. काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या आर्चआंगण येथील नातेवाइकांच्या घरी भेटीस गेले होते. संध्याकाळी ते पडेगावहून आपल्या देशमुखनगर येथील निवासस्थानाकडे परतत होते. रस्ता ओलांडताना नगर नाक्याकडून येणाऱ्या पांढऱ्या कारने दोघांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दाम्पत्य काही मीटर दूर फेकले गेले. स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोघांचे पार्थिव रविवारी मूळगाव रुईभर (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे नेण्यात येणार असून, सायं. 4.30 वाजता अंतिम संस्कार होतील.
advertisement
अनेक विद्यार्थ्यांना अपत्याप्रमाणे जपले
‎अ‍ॅड. रत्नमाला माने यांनी तीन दशकांहून अधिक काळ हायकोर्टात वकिली करत न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवला. प्रामाणिकपणा, सामाजिक जाण आणि समर्पणभावनेमुळे त्या वकील म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जायच्या. दाम्पत्याला अपत्य नव्हते, मात्र त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जपले.
advertisement
मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक
डॉ. रामराव माने हे मूळ रुईभर (धाराशिव) येथील होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 1980 ते 2024 या कालावधीत रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्य केले. अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक शैक्षणिक निर्णयांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्राच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आणि प्रयत्न निर्णायक ठरला.
advertisement
संशोधन क्षेत्रात योगदान
‎संशोधन क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय होते. त्यांच्या नावावर अनेक पेटंट नोंदवले गेले असून, राज्यस्तरीय शैक्षणिक धोरण समितीवर त्यांनी मोलाचे काम केले. अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक आधार देण्याचे काम डॉ. माने यांनी केले. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेले अनेक विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहेत. गरजू विद्यार्थ्यांसाठी ते स्वतःहून शिष्यवृत्ती देत, तर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांना आर्थिक हातभार लावत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
नातेवाईकाच्या सांत्वनासाठी गेले, परतताना काळाचा घाला, निवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने यांच्यासह पत्नीचा मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement