बापरे! स्पोर्ट बाईकमुळे 12वीच्या विद्याथ्याचं आयुष्य बदललं; रात्री जे घडलं ते पाहून संभाजीनगर थरकापल
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar : स्पोर्ट बाइकच्या व्यवहारातून बारावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : स्पोर्ट बाइकच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून सात जणांच्या टोळीने 17 वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याचे कारमधून फिल्मी पद्धतीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (2 जानेवारी) मध्यरात्री बजरंग चौकात घडली. मात्र, सिडको पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत अवघ्या दोन तासांत वाळूज परिसरातून विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी विवेक गणेश सोनवणे (वय19, रा. रांजणगाव), पांडुरंग माधवराव सोनवणे (वय 21, रा. जाधववाडी) आणि रोहन सुनील ढवळे (वय19, रा. बजाजनगर) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. टोळीतील इतर चार आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
सिडको एन-7 भागात यश ( नाव बदलेले आहे ) राहणारा हा 17 वर्षांचा विद्यार्थी बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास तो आपल्या मित्रासोबत स्कूटीवरून एन-6 कडून बजरंग चौकाच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. अचानक मागून आलेल्या दोघांनी त्याचा शर्ट पकडून ओढले. त्यामुळे तोल जाऊन स्कूटी घसरली. याच क्षणी आणखी एक आरोपी धावत येत विद्यार्थ्याला फरफटत घेऊन गेला. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून घटनास्थळावरून पसार झाले.
advertisement
अपहरणानंतर विद्यार्थ्याच्या मित्राने तात्काळ त्याच्या मामाला फोन करून माहिती दिली. मामांनी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्याशी संपर्क साधताच पोलिसांनी तातडीने दोन पथके रवाना केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वाळूजच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत वाळूज परिसरात कार अडवली. त्यावेळी आरोपी विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली.
advertisement
घटनेपूर्वी विद्यार्थ्याला त्याच्या एका मित्राने फोन करून ‘तू कुठे आहेस, मला भेटायला ये’ असे विचारले होते. या मित्रानेच आरोपींना विद्यार्थ्याचे लोकेशन दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तो सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी रोहन ढवळे याने आपली स्पोर्ट बाइक या विद्यार्थ्याला विकली होती. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून बाइकचे पैसे दिले गेले नव्हते आणि ती बाइकही गायब झाली होती. या वादामुळे विद्यार्थी काही काळ मुंबईला गेला होता. तो पुन्हा शहरात परतल्याची माहिती मिळताच आरोपींनी पूर्वनियोजित पद्धतीने त्याचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 1:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बापरे! स्पोर्ट बाईकमुळे 12वीच्या विद्याथ्याचं आयुष्य बदललं; रात्री जे घडलं ते पाहून संभाजीनगर थरकापल











