Dasara 2025 : महाराष्ट्रात इथं रावणाचे नाही तर शूर्पणखेचे केले जाते दहन, काय आहे परंपरा?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अशी एक संघटना आहे ती रावणाचे दहन न करता रावणाची बहीण शूर्पणखेचे दहन करते.
छत्रपती संभाजीनगर : आज संपूर्ण देशामध्ये अगदी उत्साहात विजयादशमी म्हणजे दसरा साजरा होत आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे रावण दहनाची परंपरा आहे. देशामध्ये मोठे मोठे रावण दहन केले जाते. पण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अशी एक संघटना आहे ती रावणाचे दहन न करता रावणाची बहीण शूर्पणखेचे दहन करते. दरवर्षी ही संघटना हे दहन करत असते. तर ही संघटना कोणती आणि त्यांच्या काय मागण्या आहेत हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पत्नी पीडित संघटना आहे. ही संघटना शहरामध्ये दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन न करता
शूर्पणखेचे दहन करण्याची परंपरा ते करतात. रावणामध्ये पुरुषी अहंकार होता तो आता पूर्णपणे संपला आहे. मात्र ज्या महिला आहेत त्यांच्यामधला अहंकार, त्यांचे पुरुषांवरती अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. बिचाऱ्या पतीला पत्नी या मुद्दाम त्रास देत आहेत. याकरिता ही पत्नीपीडित संघटना रावणाचं दहन न करता शूर्पणखेचे दहन करते.
advertisement
शूर्पणखा ही वाईट प्रवृत्तीची होती. त्याचप्रमाणे आता ज्या पत्नी आहेत त्या देखील तशाच बनत चाललेल्या आहेत. ज्या पत्नी आपल्या पतीवरती अत्याचार करतात. त्यांना त्रास देतात. मानसिक त्रास देतात तर त्यांच्या मधली ही वाईट प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि आमच्यासारख्या बिचाऱ्या पतीला अशा शूर्पणखेसारख्या पत्नीने त्रास देऊ नये. म्हणून आम्ही रावणाचे दहन न करता शूर्पणखेचे दहन करतो, असं या संस्थेचे अध्यक्ष ॲड. भरत फुलारे यांनी सांगितलं.
advertisement
त्यासोबतच जसा महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग देखील असावा अशी देखील आमची मागणी आहे. याकरता आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलेले आहे आणि एक दिवस नक्कीच पुरुष आयोग होईल अशी आमची आशा आहे, असं अध्यक्ष म्हणाले आहेत.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
October 02, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Dasara 2025 : महाराष्ट्रात इथं रावणाचे नाही तर शूर्पणखेचे केले जाते दहन, काय आहे परंपरा?