ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच दिला दगा, संभाजीनगरात 22 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार, गरोदर होताच...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका नराधमाने २२ वर्षीय तरुणीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका नराधमाने २२ वर्षीय तरुणीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुणी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या तक्रारीनुसार, राजेंद्र मच्छिंद्र भुसारे (वय ३५, रा. वाडगाव) याने तिचा विश्वास संपादन केला. त्याने तिला लग्नाचं खोटं आश्वासन देत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. लग्नाचं वचन देऊन तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत राहिला. मागील अनेक महिन्यांपासून तो पीडितेचं लैंगिक आणि मानसिक छळ करत होता.
advertisement
गर्भपातासाठी बळजबरी आणि मानसिक छळ
याच अत्याचारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. तिने आरोपीला लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर, त्याने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली. आरोपीच्या सततच्या दबावामुळे आणि मानसिक छळामुळे तिला नको असतानाही गर्भपात करावा लागला. या घटनेनंतरही आरोपीने लग्नाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे हताश झालेल्या तरुणीने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नराधमाविरोधात गुन्हा दाखल
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी राजेंद्र भुसारे याच्याविरोधात बलात्कारासह गर्भपातासाठी दबाव आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. लग्नाचं आमिष दाखवून अशाप्रकारे तरुणीचं लैंगिक शोषण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 09, 2025 8:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच दिला दगा, संभाजीनगरात 22 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार, गरोदर होताच...