Jayakwadi Dam: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडी कालव्यातून आज सुटणार पाणी

Last Updated:

Jayakwadi Dam: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

Jayakwadi Dam: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडी कालव्यातून आज सुटणार पाणी
Jayakwadi Dam: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडी कालव्यातून आज सुटणार पाणी
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही काळात मराठवाड्यात मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या वाया जाण्याची भीती असून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील आमदारांची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कडाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी दिली.
मराठवाड्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप घेतली असून शेतकऱ्यांनी केलेली खरीपाची पेरणी संकटात सापडली आहे. त्यातच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी परभणी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असतांनाही पाणी सोडले जात नाही, याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
तातडीने आवर्तन देण्याचा निर्णय
गेल्या काही काळात पावसाने दडी मारल्याने कापूस आणि सोयबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच उसाला देखील पाण्याची गरज आहे. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. जायकवाडीतून पाणी कधी सुटणार? याची अनेक शेतकरी वाट पाहात होते. त्यामुळे तातडीचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा 40 हजार हेक्टर क्षेत्राला होणार असल्याचे सब्बीनवार यांनी सांगितले.
advertisement
मुंबईत बैठक
मुंबईत झालेल्या बैठकीला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, गेवराईचे विजयसिंह पंडीत, परभणीचे आमदार राहुल पाटील, गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे, पाथरीचे राजेश विटेकर, अंबडचे आमदार हिकमत उढाण, पैठणचे आमदार विलास भुमरे, तसेच कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार मुख्य अभिंयता कडा सुनंदा जगताप, अधिक्षक अभिंयता समाधान सब्बीनवार, बीडच्या अधिक्षक अभियंता पल्लवी जगताप यांची उपस्थिती होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Jayakwadi Dam: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडी कालव्यातून आज सुटणार पाणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement