मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; या विशेष रेल्वेच्या 8 वाढीव फेऱ्या, वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada train: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सिकंदराबाद नगरसोल रेल्वेच्या 8 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. दक्षिण मध्य रेल्वेने सिकंदराबाद – नगरसोल - सिकंदराबाद विशेष रेल्वे गाडीच्या 8 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना सिकंदराबादसाठी अधिक रेल्वे गाड्यांचा पर्याय उपलब्ध होणार आहेत. यामुळे वाढती गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
विशेष रेल्वेचे वेळापत्रक
रेल्वे गाडी क्रमांक (07001) सिकंदराबाद-नगरसोल विशेष रेल्वे गाडी सिकंदराबाद येथून 2, 10, 17 आणि 24 जुलै रोजी गुरुवारी रात्री 9.10 मिनिटांनी सुटेल तसेच, लिंगमपल्ली, बोलाराम, मेडचल, कामारेडी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गे नगरसोल येथे शुक्रवारी 9.45 वाजता पोहोचणार आहे.
advertisement
मराठवाड्यातील प्रवाशांना सिकंदराबाद ते नगरसोल या विशेष रेल्वेने जायचे झाल्यास वरील तारखेनुसार नांदेड येथील प्रवाशांना पहाटे 3.10 वाजता उपलब्ध असणार आहे. परभणी येथून या विशेष गाडीने जाणाऱ्या प्रवाशांना पहाटे 4.35 वाजता या गाडीत बसता येणार आहे. तसेच, जालना येथून सकाळी 6.30 वाजता तर छत्रपती संभाजीनगर येथून 7.50 वाजता ही गाडी निघणार आहे. पुढे ही गाडी नगरसोल येथे 9.45 वाजता पोहोचेल.
advertisement
परतीच्या प्रवासासाठी रेल्वे गाडी क्रमांक (07002) नगरसोल ते सिकंदराबाद विशेष रेल्वे नगरसोल येथून 4, 11, 18 आणि 25 जुलै रोजी शुक्रवारी परतीला निघणार आहे. सिकंदराबाद-नगरसोल सिकंदराबाद या विशेष रेल्वे गाडीच्या वाढत्या फेऱ्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच, मराठवाड्याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये देखील वाढ होणार आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 24, 2025 10:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; या विशेष रेल्वेच्या 8 वाढीव फेऱ्या, वेळापत्रक


