Sambhajinagar Crime News : चोरीची मोटारसायकल ठरली खुनी आरोपीसाठी 'ट्रॅप'; दीड वर्षांपूर्वीच्या हत्याकांडाचे गुपित उघड
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुचाकी चोरी प्रकरण उघडले गेले आहे. ज्यामुळे दीड वर्षांपूर्वी घडलेला खून समोर आला.
छत्रपती संभाजीनगर : एक छोटीशी दुचाकी आणि त्यावरून उकललेला मोठा गुन्हा. दीड वर्षांपूर्वी गूढ राहिलेल्या वृद्धाच्या हत्येचा छडा अखेर लागला आहे आणि त्यामागेही आहे चोरीची दुचाकी.
बुलडाणा पोलिसांनी अलीकडे सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. मात्र अटकेनंतर त्यांनी केवळ दागिनेच नाही, तर एक खूनही कबूल केला आणि पोलिसांनाही धक्काच बसला. या दोघांनी 26 मे 2024 रोजी गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा गावात मध्यरात्री चोरीसाठी घरात शिरताना प्रतिकार करणाऱ्या 78 वर्षीय नारायण निकम यांचा पहाराने ठार मारले होते. त्यानंतर त्यांच्या सुनेलाही मारहाण करत घरातील साहित्य घेऊन फरार झाले होते.
advertisement
या घटनेनंतर पुरावे मिळत नव्हते, त्यामुळे तपासाला दिशा लागत नव्हती आणि पोलिसांवरही टीकेची झोड उठली होती. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही शिताफीने केला तरी एक ना एक दिवस सत्य समोर येतेच.
या प्रकरणाचा उलगडा झाला तो केवळ एका चोरीच्या दुचाकीमुळे. सोनसाखळी प्रकरणात पकडलेल्या आरोपींकडून जी दुचाकी जप्त झाली. ती वाळूज परिसरातून चोरीला गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वाळूज पोलिसांनी यामागचा तपास सुरू केला. चौकशीत आरोपी महेश काळे आणि मंजू पवार यांनी दीड वर्षांपूर्वीच्या खुनाची कबुली दिली.
advertisement
या प्रकरणात वाळूज पोलिसांनी दाखवलेल्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपनिरीक्षक अजय शितोळे, अंमलदार सुधाकर पाटील, नितीन धुळे यांच्या कामगिरीने हे गूढ अखेर उलगडले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 01, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar Crime News : चोरीची मोटारसायकल ठरली खुनी आरोपीसाठी 'ट्रॅप'; दीड वर्षांपूर्वीच्या हत्याकांडाचे गुपित उघड









