advertisement

Manoj Jarange Patil : 'कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास..' मनोज जरांगे पाटलांकडून अखेर 'तो' शब्द मागे

Last Updated:

Manoj Jarange Patil : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर लायकी शब्द मागे घेतोय, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

जरांगे पाटील-भुजबळ
जरांगे पाटील-भुजबळ
छत्रपती संभाजीनगर, 27 नोव्हेंबर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर लायकी शब्द मागे घेतला आहे. पुण्यातील खराडीत झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी लायकी या शब्दाचा वापर करत चौफेर टीका केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे नवं वादंग निर्माण झालं होतं. त्यानंतर रविवारी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांनी जरांगेंवर सडकून टीका केली. भुजबळांनी केलेल्या टीकेनंतरही जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला होता. मात्र, त्यानंतर आता मनोज जरांगे बॅकफूटवर आले आहेत. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर लायकी शब्द मागे घेतोय, असं म्हणत जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला.
मराठा आरक्षण मुद्यावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये रंगलेल्या वादाला नवं वळण लागलं आहे. आरक्षणाअभावी मराठ्यांना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे नवं वादंग निर्माण झालं होतं. खराडीतील जरांगेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी रविवारी हिंगोलीच्या सभेत टीका केली होती. खरं तर जरांगेंच्या पुण्यातील त्या वक्तव्यामुळे भुजबळांना टीका करण्याची आयतीचं संधी मिळाली आहे. तर त्या वक्तव्यावर खुलास करताना जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
advertisement
शिक्षण खूप घेऊन तो झेंडा पकडतो, तो बेरोजगार होतो, यासाठी मी लायकीवर बोललो होतो. (लायकीवर) मी त्यावर काय चूक बोललो, आमच्या लोकांचे हाल झाले, मी बोललो त्यात काही लायकीचा संदर्भ येत नाही, लायकी शब्दाला जातीय रंग दिला. तुम्ही हुतात्मा स्मारक गोमूत्राने धुतला. लायकीच्या वक्तव्यावरून जरांगे काहीसे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. तर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना याच मुद्यावरून डिवचलंय. जरांगे भुजबळ वादात सत्ताधारी तसेच विरोधकांनीही सावध पवित्रा घेतला आहे.
advertisement
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरागेंच्या मागणीला मंत्री छगन भुजबळांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष पेटला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना थेट आव्हनप्रतिआव्हन दिलं जात आहे. अशातचं जरांगेंनी लायकीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. त्यामुळे भविष्यात हा आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Manoj Jarange Patil : 'कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास..' मनोज जरांगे पाटलांकडून अखेर 'तो' शब्द मागे
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement