Siddharth Udyan: सिद्धार्थ उद्यानात घुमणार सिंहगर्जना! 3 वाघ जाणार अन् जंगलाचा राजा येणार
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Siddharth Udyan: छत्रपती संभाजीनगरकरांना सिद्धार्थ उद्यानात आता सिंहगर्जना ऐकू येणार आहे. लवकरच प्राणीसंग्रहालयात जंगलाचा राजा दाखल होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान हे पर्यटकांचं आणि लहान मुलांचं आकर्षणाचं केंद्र आहे. सिद्धार्थ उद्यानात आता सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी आणण्यात येणार आहे. कर्नाटकमधील शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन महापालिका अधिकाऱ्यांचे पथक शहरात आले आहे. पुढील आठवड्यातक सिंहासह इतर प्राण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील आणि शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची देवाण-घेवाण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील एक वाघ आणि दोन वाघिणी शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयात पाठविण्यात येणार आहेत. तर तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयात आणण्यात येणार आहे.
advertisement
नुकतेच शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयाचे दोन अधिकारी सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालय येथे येऊन वाघांची पाहणी करून गेले. त्यानंतर उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासह संजयन नंदन यांनी शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयात जाऊन महापालिकेला हव्या असलेल्या सिंहासह इतर प्राण्यांची पाहणी केली. त्यामुळे लवकरच वाघ आणि सिंहाची देवाण-घेवाण होणार असून छत्रपती संभाजीनगरकरांना जंगलचा राजा पाहता येणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 23, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Siddharth Udyan: सिद्धार्थ उद्यानात घुमणार सिंहगर्जना! 3 वाघ जाणार अन् जंगलाचा राजा येणार