Kolhapur News: कोल्हापुरात येणार खास शिवकालीन वस्तू! नागरिकांना मिळणार प्रत्यक्ष अनुभव

Last Updated:

Kolhapur News: पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाकडून कोल्हापुरात प्रदर्शनाचं आयोजन केलं जाणार आहे.

Kolhapur News: कोल्हापुरात येणार खास शिवकालीन वस्तू! नागरिकांना मिळणार प्रत्यक्ष अनुभव
Kolhapur News: कोल्हापुरात येणार खास शिवकालीन वस्तू! नागरिकांना मिळणार प्रत्यक्ष अनुभव
कोल्हापूर: कोल्हापूर हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अविभाज्य भाग होता. या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथील नागरिकांना अजूनही त्याचा अभिमान वाटतो. कोल्हापूरकरांच्या अभिमानात लवकरच भर पडणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापुरात ऐतिहासिक वाघनखांचं आगमन होणार आहे. ही वाघनखे नागरिकांना पाहता यावीत, यासाठी विशेष प्रदर्शन भरवलं जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाकडून या प्रदर्शनाचं आयोजन केलं जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची वेळ घेऊन या वाघनखांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजिक केला जाणार आहे. ही वाघनखे 3 मे 2026 पर्यंत शाहू जन्मस्थळ येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील.
advertisement
वाघनखे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं एक धारदार शस्त्र होतं. हे शस्त्र वाघाच्या पंज्याप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे आहेत. ही वाघनखे हातात लपवता येत असत आणि गुप्तपणे हल्ला करण्यासाठी वापरली जात असत. अलीकडेच लंडनहून ही वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यात आली आहेत. ही वाघनखे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेली होती, असं म्हटलं जात आहे.
advertisement
महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून लंडनमधील 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट' संग्रहालयातून ही वाघनखे 3 वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. नागरिकांना ही ऐतिहासिक वाघनखे पाहता यावीत यासाठी त्यांचं राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रदर्शन भरवलं जात आहे. सध्या ही वाघनखे साताऱ्यात असून 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान कोल्हापुरात येणार आहेत. वाघनखांच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलं जाणार आहे. शाही दसरा सोहळा झाल्यानंतर हे प्रदर्शन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur News: कोल्हापुरात येणार खास शिवकालीन वस्तू! नागरिकांना मिळणार प्रत्यक्ष अनुभव
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement