आरंभ संस्थेतील मुलांनी बनवल्या सुंदर वस्तू, दिवाळी स्पेशल गोष्टींनी वेधलं लक्ष
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमध्ये आरंभ स्वमग्न आणि गतिमंद मुलांची संस्था आहे. या संस्थेमध्ये सर्व स्पेशल मुले आहेत. कुठलाही सणाला आला तर ही मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू करत असतात. अतिशय सुंदर पद्धतीने ही मुलं या वस्तू तयार करतात.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आरंभ स्वमग्न आणि गतिमंद मुलांची संस्था आहे. या संस्थेमध्ये सर्व स्पेशल मुले आहेत. कुठलाही सणाला आला तर ही मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू करत असतात. अतिशय सुंदर पद्धतीने ही मुलं या वस्तू तयार करतात आणि तयार केलेल्या वस्तूची ती मुलं विक्रेते देखील करतात आणि यामधून मिळालेला जो नफा आहे तो या मुलांना दिला जातो. या संस्थेची निर्मिती कशी झाली. याविषयी संस्थेच्या संचालिका अंबिका टाकळकर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
छत्रपती संभाजी नगर शहरात राहणाऱ्या अंबिका टाकळकर यांच्या मुलाला ऑटिझम होता ऑटिझम हा काय असतो हे त्यावेळी अंबिका यांना माहित नव्हतं. त्यावेळी त्यांनी अनेक डॉक्टरांकडे त्यांच्या मुलाला दाखवलं पाहिजे त्या सर्व ट्रीटमेंट त्यांनी केला आणि त्यानंतर त्यांना कळालं की ऑटिझम म्हणजे काय हे कळलं आणि त्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या मुलासारखे इतर देखील काही मुला असतात तर त्यांच्यासाठी आपण काय तरी करावं असं त्यांना वाटलं आणि त्यानंतर त्यांनी या आरंभ संस्थेची स्थापना केली.
advertisement
या संस्थेमध्ये वय वर्ष 4 ते 40 पर्यंतचे सर्व स्पेशल मुले या संस्थेमध्ये आहेत. हे सर्व जे मुले आहेत ते प्रत्येक साँग किंवा इतर कुठलाही कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या गोष्टी तयार करत असतात.जसे दिवाळीसाठी हे मुलं स्वतः पणत्या तयार करतात त्यांना डेकोरेट करतात त्यासोबतच जी हँडमेड ज्वेलरी आहे ते देखील तयार करतात आकाश कंदील त्यासोबतच त्यांच्या सेंटेड कॅण्डल देखील तयार करतात. त्याशिवाय राखी पौर्णिमा असेल त्यासाठी राख्या तयार करतात तसेच इतरही सणांसाठी ते वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतात. आणि या वस्तूंची ते विक्री देखील करतात.
advertisement
या माध्यमातून जे सुद्धा रक्कम मिळतील ते सर्व मुलांना देण्यात येते. दिवाळीनिमित्त शहरांमध्ये विविध ठिकाणी या मुलांचं स्टॉल लागतात. त्यासोबतच मोठमोठ्या कंपनीकडून देखील मुलांना कॅण्डल त्यासोबतच पण त्यांच्या देखील ऑर्डर यातच असतात. आपण देखील या मुलांना ऑर्डर देऊ शकणार. छत्रपती संभाजी नगर शहरातील शहानुर मिया दर्गा या ठिकाणी असलेल्या डी- मार्ट च्या पाठीमागे ही आरंभ मुलांची संस्था आहेत.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 12, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आरंभ संस्थेतील मुलांनी बनवल्या सुंदर वस्तू, दिवाळी स्पेशल गोष्टींनी वेधलं लक्ष