हायवेवर आगीचे लोळ अन् धूर! डोळ्यादेखत 17 जण होरपळले, फक्त उरला सांगाडा, बस अपघाताचे अंगावर काटा आणणारे VIDEO

Last Updated:

चित्रदुर्ग जिल्ह्यात NH-48 वर Hiriyur जवळ सीबर्ड कोच बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १७ प्रवासी जळून मृत्युमुखी, १५ हून अधिक जखमी, Karnataka शोकमग्न.

News18
News18
कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भीषण रस्ता अपघात झाला असून, यामध्ये १७ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भरधाव कंटेनरने ट्रॅव्हल्सला दिलेल्या धडकेमुळे बसने पेट घेतला आणि अवघ्या काही क्षणात या आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
ही घटना चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियुर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून शिवमोगाच्या दिशेने सीबर्ड कोच ही खासगी स्लीपर बस ३२ प्रवाशांना घेऊन जात होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने अचानक दुभाजक (Divider) ओलांडला आणि थेट बसला समोरून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला.
advertisement
advertisement
या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी सचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही वेळापूर्वीच या बसने आम्हाला ओव्हरटेक केले होते. पण काही अंतरावरच समोरून येणाऱ्या ट्रकने नियंत्रण गमावले आणि तो दुभाजक तोडून थेट बसच्या त्या बाजूला धडकली जिथे डिझेलची टाकी होती. धडक बसताच क्षणात आगीचे लोळ उठले आणि काही कळायच्या आत बस आगीच्या विळख्यात सापडली."
advertisement
advertisement
बसमध्ये एकूण ३२ जण होते. आगीने इतके भीषण रूप धारण केले होते की, ११ प्रवाशांचा जागीच जिवंत जळून मृत्यू झाला, तर धडकेत कंटेनर चालकाचाही प्राण गेला. या अपघातात २१ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
advertisement
सध्या घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भरधाव कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अनर्थ ओढवल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक आणि प्रवाशांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हायवेवर आगीचे लोळ अन् धूर! डोळ्यादेखत 17 जण होरपळले, फक्त उरला सांगाडा, बस अपघाताचे अंगावर काटा आणणारे VIDEO
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement