BMC Election : 'राज तर सोडा, उद्धव यांच्यासोबतही आघाडी नाही', काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, BMC निवडणुकीत मविआत बिघाडी!

Last Updated:

Congres On Raj Thackeray Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून तसे संकेतही मिळत आहेत. तर, राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येतील का, याकडे ही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

'राज तर नाहीच उद्धव यांच्यासोबतही आघाडी..', काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य,  BMC निवडणुकीत मविआत बिघाडी
'राज तर नाहीच उद्धव यांच्यासोबतही आघाडी..', काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, BMC निवडणुकीत मविआत बिघाडी
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महायुतीमधील पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्यावर महायुतीतील पक्षांचा जोर आहे. तर, दुसरीकडे विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीतही स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आघाडी करणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्याने केले आहे.
advertisement
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. तर, दुसरीकडे या स्थानिक निवडणुकांसाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची समजली जाते.. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून तसे संकेतही मिळत आहेत. तर, राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येतील का, याकडे ही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement

काँग्रेस नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य...

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या पक्षांसोबत कोणतीही निवडणूक युती करणार नसल्याची चर्चा सुरू होती. अशातच आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पुन्हा एकदा आघाडीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
advertisement
भाई जगताप यांनी सांगितले की, “मुंबई महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नव्हे. अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्यांनाही निवडणूक लढवण्याची इच्छा असते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा विचार आधीपासूनच मांडला आहे.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांनी काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही हीच भूमिका मांडली होती, असे त्यांनी म्हटले.
advertisement

राज ठाकरे सोडा, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही...

राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत विचारले असता, भाई जगताप यांनी म्हटले की, राज ठाकरे तर दूरच, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही निवडणूक लढणार नाही. काँग्रेसने कधीच ‘राज ठाकरेंना सोबत घेऊ’ असे म्हटलेले नाही,” असे जगताप म्हणाले. त्यांनी हेही सांगितले की, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना जेव्हा आली तेव्हा ती एकच होती, मात्र आज दोन गट निर्माण झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
advertisement
भाई जगताप यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या आगामी रणनीतीचे संकेत मिळत असून, शिवसेना-ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतची संभाव्य युतीची शक्यता आता क्षीण झाली असल्याचे म्हटले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : 'राज तर सोडा, उद्धव यांच्यासोबतही आघाडी नाही', काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, BMC निवडणुकीत मविआत बिघाडी!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement