नेत्यांच्या भांडणात काँग्रेस महापालिकेची सत्ता गमावणार? धानोरकर वडेट्टीवारांना म्हणाल्या, माझ्या मतदारसंघात लक्ष घालायचं नाही!

Last Updated:

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय.

विजय वडेट्टीवार-प्रतिभा धानोरकर
विजय वडेट्टीवार-प्रतिभा धानोरकर
नागपूर/चंद्रपूर : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु पक्षातली बंडाळी समोर नाही आली तरच नवल! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष कमालीचा उफाळून आला आहे. अखेर या संघर्षात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हस्तक्षेप करणार आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय. चंद्रपूर मनपातील गट नेता निवडीवरून दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू आहेत. चंद्रपूरमधील संघर्ष शमविण्यासाठी उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपुरात पोहचणार आहेत.

विजय वडेट्टीवार-प्रतिभा धानोरकर यांच्यात संघर्ष

हर्षवर्धन सपकाळ हे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची एकत्रित बैठक घेणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमधले दूर करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ करतील. AICC चे प्रभारी आणि विदर्भातील मनपा निवडणूक प्रमुख कुणाल चौधरी देखील राहणार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
advertisement
चंद्रपूर महानगर पालिकेतील काँग्रेस नागरसेवकांपैकी काही नगरसेवक विजय वडेट्टीवार यांनी पळवल्याचा आरोप धानोरकर यांनी केला. दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पक्षाशी प्रामाणिक असल्याचा पलटवार वडेट्टीवार यांनी केला.

माझ्या मतदारसंघात लक्ष घालू नका, राज्यात लक्ष द्या

विजय वडेट्टीवार यांनी माझ्या मतदारसंघात फार लक्ष घालू नये. त्यांच्या नेतृत्वाची गरज राज्याला आहे, पक्षाला आहे. त्यांनी राज्यात अधिकाधिक लक्ष घालावे. माझ्या मतदारसंघात फार ढवळाढवळ आणि हस्तक्षेप करू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.
advertisement

नेत्यांच्या भांडणात काँग्रेस महापालिकेची सत्ता गमावणार?

चंद्रपूर महानगरपालिकेच्या १७ प्रभागातील ६६ जागांपैकी सर्वाधिक २७ जागा काँग्रेसने जिंकल्या. काँग्रेस २७ जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला. भारतीय जनता पक्षाने २२ जागा जिंकल्या.
ठाकरे शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीने ८ जागा जिंकल्या. दुसरीकडे शेकापने तीन आणि बसपाने एक जागा जिंकली.
काँग्रेसचा महापौर महापालिकेत बसत असताना नेत्यांच्या भांडणात उलटफेर होण्याची भीती अनेक जण वर्तवत आहेत. नेत्यांची भांडणे थांबली नाही तर वेगळे समीकरण आकाराला येण्याची शक्यता अनेक जण बोलून दाखवत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नेत्यांच्या भांडणात काँग्रेस महापालिकेची सत्ता गमावणार? धानोरकर वडेट्टीवारांना म्हणाल्या, माझ्या मतदारसंघात लक्ष घालायचं नाही!
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement