Congress : 'तेरे को देख लेंगे', फाळणीवरील डिबेट शोनंतर काँग्रेस नेत्याला जीवे मारण्याची धमकी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Congress : काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर: काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. लोंढे यांनी सांगितले की, एका नंबरवरून त्यांना सातत्याने फोन करण्यात आले, शिव्या दिल्या गेल्या आणि “तेरेको देख लेंगे” अशी थेट धमकी देण्यात आली.
यापूर्वी देखील आपल्याला अनेकदा अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत, मात्र या वेळी धमकी अधिक गंभीर स्वरूपाची होती, असे अतुल लोंढे म्हटले. भाजपच्या लोकांकडे अनेक मुद्यांचं उत्तर नसतं, आम्ही प्रश्न विचारल्यावर ते अडचणीत येतात आणि मग अशा पातळीवर उतरतात,” असा आरोप त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीवरील फाळणीच्या मुद्यावर डिबेट शो आयोजित करण्यात आला होता. या चर्चेत सत्य बाजू मांडल्यामुळे काहींना राग आला आणि त्यामुळेच ही धमकी दिली गेल्याचे लोंढे यांनी दावा केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना धमक्या मिळणं आता ही सामान्य बाब होत असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
advertisement
इस नंबर से फोन आया
गाली गलौज करने लगे
जान से मारने की धमकी देने लगे
कृपया संज्ञान में लीजिए
.@nagpurcp उचित कार्रवाई कीजिए 🙏 pic.twitter.com/99C4TiGjDK
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) August 14, 2025
advertisement
पोलिसांनी दखल घ्यावी...
लोंढे यांनी पोलीस प्रशासनाला याबाबत तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले. विचार सहन होत नसतील तर चर्चा बंद करा. पण आमच्या जीवावर उठणं हा प्रकार लोकशाहीसाठी धोक्याचा असल्याचे लोंढे यांनी म्हटले. सरकार शांत बसत असेल तर यात सरकारचा सहभाग आहे का, हा प्रश्न आम्ही विचारतो,” असा थेट सवाल त्यांनी सरकारकडे केला.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 15, 2025 8:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress : 'तेरे को देख लेंगे', फाळणीवरील डिबेट शोनंतर काँग्रेस नेत्याला जीवे मारण्याची धमकी


