Mouthwash Cleaner: तुम्ही माऊथवॉश वापरता? उपयुक्त की नुकसानदायक जाणून घ्या...

Last Updated:

Why You Should Not Use Mouthwash: दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी माऊथवॉशचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तोडांची नीट सफाई केली नाही, तर मुखदुर्गंधीची समस्या उद्भवण्याची शक्यता दाट असते.

+
माऊथवॉशचा

माऊथवॉशचा दररोज वापर ; खरंच उपयुक्त की नुकसानदायक जाणून घ्या सविस्तर माहिती..!

दातांच्या वाढत्या समस्या लक्षात घेत ओरल हायजिनबाबत लोक अधिक जागरूक झाले आहेत. दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी माऊथवॉशचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तोडांची नीट सफाई केली नाही, तर मुखदुर्गंधीची समस्या उद्भवण्याची शक्यता दाट असते. अशा परिस्थितीत, दात आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी माऊथवॉश करण्याचा सल्ला दिला जातो. पण, याचा दररोज वापर करणे खरंच योग्य आहे का? यासाठी त्याचे फायदे-तोटे जाणून घेऊया.
माऊथवॉश वापरण्याचे फायदे काय?
आपल्या तोंडात विविध प्रकारचे बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियांचा निपटारा करण्यासाठी माउथवॉशचा वापर केला जातो. माऊथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी आणि दात किडण्यापासून वाचतात. याशिवाय फ्रेशनेस येतो. त्यामुळे अनेक तज्ञमंडळीकडून माउथवॉश वापरण्याचा सल्ला दिला जातो.
माऊथवॉशचे तोटे काय?
माऊथवॉशचा वापर केल्याने तोंडात लगेचच थंडावा आणि फ्रेशनेस जाणवतो. यामुळे आत्मविश्वासही वाढतो. मात्र, काही माउथवॉशमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते, जे तोंडातील नैसर्गिक ओलावा कमी करते. त्यामुळे दीर्घकाळ वापरल्यास तोंड कोरडे पडणे, तहान वाढणे आणि संवेदनशीलता निर्माण होणे अशा समस्या दिसतात.:... बहुतेकजण माउथवॉश वापरल्यानंतर तोंडाची चव खराब झाल्याची तक्रार करतात. याशिवाय याच्या सततच्या वापरामुळे तोंड कोरडे होते. काहींना दातांवर डाग पडण्याची समस्या देखील जाणवली आहे. दात कमकुवत होतात आणि खरखरीत व्हायला सुरुवात होते.
advertisement
माऊथवॉशचा वापर करणे योग्य की अयोग्य ?
माऊथवॉशचे लेबल वाचून घ्यावे. त्यावरील सूचनांचे पालन करावे. शक्य असल्यास सौम्य, अल्कोहोल विरहीत माऊथवॉश वापरावे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वापर करू शकता. तसेच नैसर्गिक माउथवॉशचा वापर करू शकता.
नैसर्गिक माउथवॉशचा वापर करा...
तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे माउथवॉश उपलब्ध असतात, परंतु त्यामध्ये अनेकदा रसायनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काही वेळा तोंडात कोरडेपणा, चव जाणे किंवा संवेदनशीलता वाढणे अशा समस्या निर्माण होतात. यासाठी घरच्या घरी तयार केलेला नैसर्गिक माउथवॉश हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कडूलिंब आणि पुदिन्याची पाने ही तोंडातील जंतू नष्ट करण्यास, दुर्गंधी कमी करण्यास आणि हिरड्यांचे आरोग्य टिकविण्यास मदत करतात. नैसर्गिक माउथवॉश तयार करण्यासाठी एक कप पाणी उकळून त्यात काही कडूलिंबाची आणि पुदिन्याची पाने टाका. हे मिश्रण काही मिनिटे उकळल्यानंतर थंड होऊ द्या आणि नंतर गाळून बाटलीत साठवा. दररोज सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण वापरल्यास तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते, दात स्वच्छ राहतात आणि तोंडात ताजेतवानेपणा टिकतो. हा माउथवॉश कोणत्याही प्रकारचे रसायन नसल्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mouthwash Cleaner: तुम्ही माऊथवॉश वापरता? उपयुक्त की नुकसानदायक जाणून घ्या...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement