Devendra Fadnavis : कोरटकर चिल्लर माणूस, तुम्ही नेहरुंचा निषेध करणार का? मुख्यमंत्री आक्रमक

Last Updated:

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावताना पंडित नेहरू यांचाही निषेध करणार का, असा सवाल केला.

News18
News18
मुंबई: प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावताना पंडित नेहरू यांचाही निषेध करणार का, असा सवाल केला.
विधन परिषदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, मागील काही काळात महापुरुषांचा अपमान करण्यात येत आहे. प्रशांत कोरटकर ही नागपूरमधील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काहीही बोलते. अभिनेता राहुल सोलापूरकर ही बोलतो. प्रशांत कोरटकरला जेलमध्ये टाकणार की नाही, कोरटकर हा कोणाचा कार्यकर्ता आहे असा सवाल दानवे यांनी केला.
advertisement
विरोधकांच्या या आक्षेपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. त्याला सोडणार नाही. पण, तुम्ही विरोधक जितेंद्र आव्हाडचा निषेध कधी करणार, रेकोर्डवर भाषण आहे, ठाराविक भूमिका तु्म्हाला घेता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे म्हटले की, त्याच्याही पलिकडे जाऊन सांगतो की, पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं , त्याचं निषेध करणार का असा सवाल त्यांनी केला. तुम्ही नेहरूंचा धिक्कार करणार का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : कोरटकर चिल्लर माणूस, तुम्ही नेहरुंचा निषेध करणार का? मुख्यमंत्री आक्रमक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement