Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबाची हजेरी

Last Updated:

देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. फडणवीसांच्या या शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटंबही उपस्थित आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबाची हजेरी
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबाची हजेरी
मुंबई : देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये फडणवीसांचा शपथविधी सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडेल. फडणवीसांच्या या शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटंबही उपस्थित आहे.
रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनंत अंबानी आणि त्यांच्या पत्नी राधिका या सोहळ्याला उपस्थित आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी या शपथविधी सोहळ्यात अंबानी कुटुंबाचं स्वागत केलं.
advertisement
अंबानी कुटुंबासह सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली याचसोबत शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दिक्षीत, रणवीर सिंग या बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू उपस्थित आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबाची हजेरी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement