धनंजय मुंडे पुन्हा गोत्यात, वाल्मीक कराडनंतर नव्या प्रकरणामुळे अडचणी वाढल्या, दमानियांना नोटीस

Last Updated:

Dhananjay Munde News: माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता एका नव्या प्रकरणामुळे मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

News18
News18
मुंबई: माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडचं कनेक्शन समोर आलं होतं. याबाबतचे काही फोटोज समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी नैतिकता पाळत राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं.
राजीनामा दिल्यानंतर देखील धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. आता एका नव्या प्रकरणामुळे मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी वस्तू खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. तीन वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीत तब्बल ६०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.
advertisement
या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांत पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवावा, असं नोटीशीत म्हटलं आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतचे सर्व पुरावे, तपास यंत्रणेसमोर सादर करावेत, असंही नोटीसीत सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.
advertisement
या सगळ्या घडामोडीनंतर आता धनंजय मुंडे पुन्हा गोत्यात सापडण्याची शक्यता आहे. दमानिया यांचा जबाब नोंदवल्यानंतर, त्याआधारे धनंजय मुंडेंना देखील चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे आधीच वाल्मीक कराड प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. एकूण अशी परिस्थिती असताना आता या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडे पुन्हा गोत्यात, वाल्मीक कराडनंतर नव्या प्रकरणामुळे अडचणी वाढल्या, दमानियांना नोटीस
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement