Kids Screen Time : लहान मुलांचा 'स्क्रीन टाइम' करायचाय? या 6 टिप्सच्या मदतीने सुटेल मोबाईलची सवय
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Managing Screen Time For Toddlers : खेळ कमी खेळल्यामुळे मुलांना प्रसंगी थोडेसे धावल्यानंतरही थकवा जाणवतो. मुलांची शारीरिक ताकद आणि सहनशक्ती कमी होत जाते. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचा 'स्क्रीन टाइम' कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे.
मुंबई : आजकालची मुलं मैदानावर जाऊन खेळण्याऐवजी घरातच मोबाईल किंवा टॅबवर वेळ घालवताना दिसतात. पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहायची, पण आता परिस्थिती बदलली आहे. जास्त वेळ गॅजेट्स वापरल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो आणि ते शारीरिकरित्या निष्क्रिय होतात.
मैदानी खेळ कमी खेळल्यामुळे मुलांना प्रसंगी थोडेसे धावल्यानंतरही थकवा जाणवतो. म्हणजे एकूणच मुलांची शारीरिक ताकद आणि सहनशक्ती कमी होत जाते. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचा 'स्क्रीन टाइम' कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला त्यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत.
मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्याचे सोपे मार्ग..
advertisement
स्वतः गॅजेट्सचा वापर कमी करा : मुलं नेहमीच आपल्या पालकांचे अनुकरण करतात. तुम्ही स्वतः दिवसभर मोबाईल किंवा टॅबमध्ये गुंतलेले असाल, तर मुलांनाही तीच सवय लागेल. त्यामुळे मुलं तुमच्या आजूबाजूला नसतील तेव्हाच गॅजेट्सचा वापर करा. मुलं अभ्यास करत असताना त्यांच्या समोर मोबाईल किंवा लॅपटॉपवर गेम खेळणे किंवा व्हिडिओ पाहणे टाळा.
भेट म्हणून गॅजेट्स देऊ नका : अनेक पालक मुलांना सहजपणे गॅजेट्स विकत घेऊन देतात. पण असे करणे टाळा. तुमचे मूल किशोरवयीन नसेल तर त्याला टॅब किंवा मोबाईल देऊ नका. मुलांना त्यांच्या मित्रांकडे पाहून गॅजेट्सची मागणी करण्याची सवय लागते, परंतु योग्य वय आल्यावरच त्यांना ही उपकरणे द्या. अन्यथा मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी दिवसभर गेम्स किंवा व्हिडिओ पाहण्याची सवय लागेल.
advertisement
मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या : मुलांना अशा कामांमध्ये व्यस्त ठेवा ज्यात स्क्रीनचा वापर होत नाही. त्यांना बाहेर बागेत खेळायला जाण्यास सांगा, गोष्टींची पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करा. 5 ते 17 वयोगटातील मुलांना तुमच्यासोबत व्यायामासाठी घेऊन जा. यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतील.
वेळ निश्चित करा : तुमच्या मुलांनी मोबाईलवर किती वेळ घालवायचा हे तुम्हीच ठरवले पाहिजे. शाळा सुटल्यानंतर लगेच 4 तास मोबाईलमध्ये गुंतून राहणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि अभ्यासासाठी हानिकारक आहे. 10 वर्षांखालील मुलांना दररोज 1 ते 2 तासांपेक्षा जास्त वेळ गॅजेट्स वापरू देऊ नका. किशोरवयीन मुलांसाठीही 'स्क्रीन टाइम' निश्चित करा.
advertisement
पॅरेंटल कंट्रोलचा वापर करा : मुलांच्या मोबाईल वापरासाठी पॅरेंटल कंट्रोलचा वापर करणे खूप आवश्यक आहे. अनेकदा मोबाईल किंवा लॅपटॉपवर मुलांसाठी अयोग्य गोष्टी उघडल्या जातात. अशा परिस्थितीत त्यांना पासवर्ड सांगू नका. त्यांना मोबाईल हवा असेल तेव्हा तुम्ही स्वतः तो उघडून त्यांना द्या.
'गॅजेट-फ्री' वेळेची सवय लावा : दिवसातील काही वेळ असा निश्चित करा ज्यात घरातील कोणताही सदस्य गॅजेट्सचा वापर करणार नाही. त्या वेळेत एकत्र बसून गप्पा मारा. जेवताना घरातील मोठ्यांनीही मोबाईलचा वापर करू नका. कारण मोठ्यांना पाहूनच मुलांना अशा सवयी लागतात. शक्य तितके एकमेकांशी संवाद साधा.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 9:50 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kids Screen Time : लहान मुलांचा 'स्क्रीन टाइम' करायचाय? या 6 टिप्सच्या मदतीने सुटेल मोबाईलची सवय