Accident News : धाराशिवमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ट्रकने रिक्षाला चिरडलं; 4 जागीच ठार, 3 गंभीर

Last Updated:

Accident News : धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ट्रक आणि रिक्षाच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ट्रकने रिक्षाल चिरडलं
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ट्रकने रिक्षाल चिरडलं
बालाजी निरफळ, प्रतनिधी
धारशिव, 28 ऑगस्ट : गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासनाने उपाययोजना करुनही अपघात थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. परिणामी लाखो लोकांना दरवर्षी आपला जीव गमवावा लागतो. अशाच एक भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर हा भीषण अपघात घडला आहे. ऍप्पे रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली.
advertisement
हा अपघात इतका भयानक होता की यात रिक्षामधील 4 प्रवासी जाग्यावरच ठार झाले तर 3 गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यातील सुंदरवाडी येथील रहिवाशांचा अप्पे ऑटोला तळमोड नजीकच्या कर्नाटक सीमेवर कर्नाटक हद्दीत भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ऑटो मधील चौघाचा मृत्यू झाला असून तीन जखमी आहेत तर एक बालक सुखरूप आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ऐन सीमेवर कर्नाटक हद्दीत घडली.
advertisement
मृतांमध्ये ऑटो चालक
सुनील महादेव जगदाळे, चालक (वय 40)
रिक्षा चालकाची पत्नी बायको प्रमिला सुनील जगदाळे (वय 35)
सुनीलची आई अनुसया महादेव जगदाळे (वय 70)
पूजा विजय जाधव, (वय 18, भाची) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर गीता शिवराम जगदाळे (वय 35) गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे.
advertisement
अस्मिता शिवराम जगदाळे (वय 11), लक्ष्मी सुनील जगदाळे (वय 11) हे किरकोळ जखमी असून एका बालकाला काहीच झाले नाही. मृत सुनील हे आपल्या मालकीच्या (MH24- M --1319) या आप्पे ऑटोमधून देवदर्शनाकरिता शेजारील कर्नाटक मधील अमृत कुंड येथे गेले होते. देवदर्शन करुन परत येताना हैद्राबादहुन सोलापूरकडे जाणाऱ्या (KA56- 0575) ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भयंकर अपघात झाला. मृत सुनील यांचे कुटुंब मुरुम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Accident News : धाराशिवमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ट्रकने रिक्षाला चिरडलं; 4 जागीच ठार, 3 गंभीर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement