Dharashiv News : कुत्र्यानं आणली कवटी अन् उलगडलं बेपत्ता महिलेचं गूढ; धाराशिवमधील धक्कादायक प्रकारानं खळबळ

Last Updated:

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

News18
News18
धाराशिव, 28 नोव्हेंबर, बालाजी निरफळ : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्यामुळं बेपत्ता महिलेचं गूढ उलगडलं आहे. ही घटना तुळजापूरमधील आहे. पाचुंदा तलाव परिसरातून कुत्र्यानं एक कवटी उचलून आणली होती. या कवटीमुळे दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याच उलगडा झाला आहे. दरम्यान घटनास्थळी आढळून आलेल्या वस्तूवरून या महिलेच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली आहे. मात्र तरीदेखील पूर्णपणे खात्री पटवण्यासाठी आता पोलिसांकडून डीएनए चाचणी केली जाणार आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाचुंदा तलावाच्या परिसरातून कुत्र्याने एक मानवी कवटी तोंडात धरून आणली या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  घटनास्थळाची पाहाणी केली असता तिथे साडी मंगळसूत्र आणि काही कपडे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या वस्तूंच्या आधारे तपास सुरू केला.
advertisement
3 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरातील रहिवासी असलेल्या अनिता इंगळे या घरातून निघून गेल्याची नोंद तुळाजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तू  या महिलेच्या घरच्यांना दाखवल्या, या वस्तूच्या आधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली आहे. मात्र तरी देखील मृतदेहाबद्दल अधिक खात्री करण्यासाठी पोलिसांकडून आता डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : कुत्र्यानं आणली कवटी अन् उलगडलं बेपत्ता महिलेचं गूढ; धाराशिवमधील धक्कादायक प्रकारानं खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement