शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
- Published by:Suraj
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत नेते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. पुण्यात रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्ञानेश्वर पाटील यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख होती. ठाकरेंचे निष्ठावंत असलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांनी टॅक्सी ड्रायवर ते आमदार असा प्रवास केला होता.
advertisement
ज्ञानेश्वर पाटील यांच्या दुःखद निधनामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची मोठी हानी झालीय. ते १९९५, १९९९ या काळात आमदार होते. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर आज परंडा येथे अंत्यविधी होणार आहेत. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत पार्थिव दर्शनासाठी राहत्या घरी ठेवले जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2024 9:01 AM IST