तुळजापुरात काळे झेंडे दाखवले; बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले मराठा आरक्षणाचे मारेकरी...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
चंद्रशेखर बावनकुळे हे तुळजापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुळजापूर, 6 डिसेंबर, बालाजी निरफळ: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलाच आक्रमक झाला आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तुळजापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी पुन्हा एकदा तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
'ठाकरे सरकारच्या काळात मराठ्यांचं आरक्षण गेलं, ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करू शकलं नाही. त्यांंना साधा वकीलही लावता आला नाही. मराठा आरक्षणाचे मारेकरी असलेल्या तत्कालीन ठाकरे सरकारला काळे झेंड दाखवा. मी मराठा आरक्षणाच्या बाजुने आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याची' प्रतिक्रिया यावर बावनकुळे यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर सरकारने शिंदे समितीची नियुक्ती केली. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी त्यांनी सरकारला आरक्षणासाठी आता 24 डिसेंबरपर्यंतची नवी डेडलाईन दिली आहे.
Location :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
December 06, 2023 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
तुळजापुरात काळे झेंडे दाखवले; बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले मराठा आरक्षणाचे मारेकरी...