धाराशिव लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा; 'मविआ'त बिघाडी होणार?

Last Updated:

धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्याकडून धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात आला आहे.

News18
News18
धाराशिव, 14 ऑगस्ट, बालाजी निरफळ :  धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्याकडून धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. या लोकसभेच्या जागेसाठी देशमुख यांच्याकडून माजी मंत्री बसवराज पाटील यांचं नाव सूचवण्यात आलं आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत.
देशमुखांचा धाराशिव दौरा 
अमित देशमुख रविवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसनं बसवराज पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. या बैठकीनंतर अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, बसवराज पाटील यांचं नाव धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी सूचवण्यात आलं आहे. त्यांना येथून उमेदवारी मिळावी, असं म्हणत देशमुख यांनी एकप्रकारे या मतदारसंघावर दावाच केला आहे.
advertisement
मविआत बिघाडीची शक्यता 
दरम्यान सध्या हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत. साहाजिकच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून त्यांनाच येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये आता काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्यानं मविआत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिव लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा; 'मविआ'त बिघाडी होणार?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement