निसर्गप्रेमीनं फुलवलं नंदनवन! 300 एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर नटवला वनराईने, पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील एका निसर्ग प्रेमीने तीनशे एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर वनराईने नटवलाय.
धाराशिव, 28 नोव्हेंबर : वृक्ष लागवड आणि संगोपन ही आता काळाजी गरज बनलीय. काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात. धाराशिव जिल्ह्यातील एका निसर्ग प्रेमीने तीनशे एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर वनराईने नटवलाय. 1 लाख 5 हजार वृक्षांची लागवड करून नंदनवन फुलवलेय.
तर ध्यान केंद्राच्या माध्यमातून ध्यान साधना आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा ही समावेश त्यांनी याठिकाणी केलाय.
औषधी वनस्पतींसह, दुर्मिळ वनस्पतींचा सामावेश
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हाडोंग्री येथील बाळासाहेब पाटील यांनी धाराशिव इको व्हिलेज तयार केलंय. वडीलोपार्जित तीनशे एकर उजाड आणि ओसाड माळरानावर त्यांनी वृक्षांची लागवड केली आहे. त्यामध्ये फळांची फुलांची आणि औषधी वनस्पतींची लागवड केलीय. कडुलिंब, आंबा, पेरू, अंजीर, सिताफळ, ड्रॅगन, औषधी वनस्पती साग, गळलिंबू त्याचबरोबर गुलमोहर यासह अनेक देशी-विदेशी दुर्मिळ वृक्षांची लागवड केली आहे. इथं पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा आवाज, कोल्ह्यांची कोल्हेकुई आणि पशुपक्ष्यांचे थवे निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य अनुभवायला मिळंतय.
advertisement
डोंगरावरील झाडांना टँकरने पाणीपुरवठा
लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते तर डोंगरावरती सिंचनाची सोय नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड केलीय.
वृक्ष लागवडीमुळे इथलं तापमान 2 अंशांनी कमी
खरं तर एकेकाळी उजाड आणि ओसाड असलेला हा परिसर वनराईने नटलाय आणी बहरलाय. इथलं तापमान बाकीच्या तापमानापेक्षा दोन अंशांनी कमी असल्याचे बाळासाहेब पाटील सांगतात. बाळासाहेब पाटील यांच्याकडे 110 गाई आहेत. ज्या माध्यमातून दुधातून अर्थार्जन तर होतेच परंतु सेंद्रिय शेतीसाठी मदत होतेय.
advertisement
आयुर्वेदिक हॉस्पिटल
वनराईने नटलेल्या या परिसरात आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारलेय. ध्यान केंद्र-स्वामी सर्वेषानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान धरणा केली जाते. या ठिकाणी अध्यात्मिक ग्रंथ पुस्तके आणि स्वामीजींचे मार्गदर्शन उपलब्ध आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ व्यतीथ करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी साधना करता येतेय. निवासाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 28, 2023 4:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
निसर्गप्रेमीनं फुलवलं नंदनवन! 300 एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर नटवला वनराईने, पाहा Video