शेतकरी कन्येची मोठी भरारी, शिक्षणासाठी आलंय जपानचं बोलावणं, Video

Last Updated:

सामान्य शेतकरी कुटुंबातील संजीवनी पुरी हिला उच्च शिक्षणासाठी जपानमधून रेड कार्पेट अंथरले जात आहे.

+
आठवी

आठवी पास तरुणाचं देशी जुगाड, विजेशिवाय चालतेय पिठाची गिरणी, Video

जालना, 28 नोव्हेंबर: जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करून दाखवता येते. हे जालन्यातील एका मुलीने सिद्ध करून दाखवले आहे. एकीकडे भारतात उच्च शिक्षण घेणे सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर जात असताना जालना जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील संजीवनी पुरी या मुलीला जपानमधून उच्च शिक्षणासाठी रेड कार्पेट अंथरले जात आहे. जालना तालुक्यातील रामनगर जवळील निरखेडा येथील संजीवनी पुरीचे टॅलेंट पाहून जपान सरकारने त्यांच्या देशातील टॉपच्या वैद्यकीय इन्स्टिट्युट मध्ये एमबीबीएस करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. तसेच तिच्या शिक्षणासाठी मोठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
शेतकरी कन्येची भरारी
संजीवनी पुरी ही मूळची निरखेडा या छोट्या गावातील रहिवासी असून, तिचे वडील अनिल पुरी शेती करतात. तिचे प्राथमिक शिक्षण रामनगर येथील इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये झाले. तर सध्या ती खरपुडी येथील बळीराजा करिअर ॲकाडमीमध्ये नीट परीक्षेची तयारी करीत आहे. भारतीय विज्ञान संस्था इस्रोच्या वतीने देशातील साठ विद्यार्थ्यांची जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली होती. त्यात संजीवनीचा समावेश होता. गेल्या आठवड्यात या विद्यार्थ्यांचा जपान दौरा पार पडला.
advertisement
शिक्षणासाठी जपानचं निमंत्रण
जपान दौऱ्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी विद्यापीठे तसेच जपानची अवकाश संशोधन संस्था जेस्काला भेट दिली. या भेटीत हरहुन्नरी संजीवनीने जपानमध्ये आपल्या टॅलेन्टची छाप सोडली. तिच्या टॅलेंटने प्रभावित झालेल्या जपान मधील महत्त्वाच्या विद्यापीठांनी तिला जपान इथं शिक्षण घेण्यासाठी निमंत्रित केलं आहे. तसेच तिथं मिळणाऱ्या शिष्यवृत्ती देखील ऑफर केल्या आहेत. दरम्यान, संजीवनी पुरी हिने तिचे शिक्षक संदीप नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हायजेनिक टी कपाची निर्मिती केली होती. यासाठी तिने पेंटेट मिळावे म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. तिच्या याच प्रयोगामुळे जपान दौऱ्यासाठी निवड झाली होती.
advertisement
या संशोधनामुळे मिळाली संधी
मी सामान्य शेतकरी कुटुंबातील असून माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तर उच्च प्राथमिक शिक्षण इंदिरा गांधी विद्यालय रामनगर येथे झाले. नववीमध्ये असताना केलेल्या हायजिनिक टी कप सर्विंग ट्रे या प्रयोगामुळे मला जपानला जाण्याची संधी मिळाली. या दौऱ्या दरम्यान मला जपान मध्ये शिक्षण घेण्यासाठी निमंत्रण मिळालं असून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देखील ऑफर करण्यात आले आहेत. मी या गोष्टींचा सध्या गांभीर्याने विचार करत असून येत्या काळात पुढील निर्णय घेणार असल्याचे संजीवनी पुरे यांनी सांगितलं. माझ्या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल मला सार्थ अभिमान असून इतर विद्यार्थिनींनी देखील संजीवनी कडून प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये यश संपादन करावं असे शिक्षक संदीप नवगिरे यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
शेतकरी कन्येची मोठी भरारी, शिक्षणासाठी आलंय जपानचं बोलावणं, Video
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement