Water Crisis : जलसंधारण विभागाचा नकार; तरी धाराशिवचे आरक्षित पाणी लातूरला; एका फोनने बदलला निर्णय
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Water Crisis : लातूर जिल्यातील औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेत धाराशिवचे जिल्हाधिकारी खासदार यांच्यासोबत बैठक घेतली.
धाराशिव, 19 ऑक्टोबर (बालाजी निरफळ, प्रतिनिधी) : धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पाण्यावरुन राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. जिल्ह्यातील धरणाने तळ गाठला असून जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त घोषित करत पिण्याला आरक्षित ठेवले आहे. असे असताना धाराशिव जिल्ह्याचे पाणी पुन्हा लातूरला देण्यात आले आहे. यावरुन आता पुन्हा एकदा धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातील पाणी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याला सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीत फोन लावण्यात आला, त्याला लागलीच मंजुरी ही देण्यात आली. आज धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत पाणी मागणीची बैठक झाली. त्यात जलसंधारण विभागाने पाणी देणे शक्य नसल्याचे सांगितले. तरी देखील विशेष बाब म्हणून हे पाणी मंजूर करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून धरणात केवळ आठ टक्के पाणीसाठा उपयुक्त आहे. असे असताना देखील अभिमन्यू पवार यांनी आपले राजकीय वजन वापरत धाराशिव जिल्ह्याचे पाणी लातूरला पळवले असल्याचे चर्चा धाराशिव जिल्ह्यात रंगताना पाहायला मिळत आहे.
advertisement
मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट
मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या जेमतेम 85 टक्के पाऊस पडला. त्यातही नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यावर अधिक आभाळमाया राहिल्याने अन्य सहा जिल्ह्यांवर जलसंकट घोंगावते आहे. या जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात आजघडीला केवळ 31 टक्केच जलसाठा उरला आहे. या प्रकल्पात केवळ 26 टक्के जलसाठा आहे. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात 22 टक्के, बीड जिल्ह्यातील 16 मध्यम धरणात 42 टक्के, लातूरमधील 8 प्रकल्पात 28 टक्के. धाराशिवमधील 17 प्रकल्पात 16 टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील 9 प्रकल्पांत 61 टक्के आणि परभणी जिल्ह्यातील 2 प्रकल्पात 25 टक्के जलसाठा आहे. याचप्रमाणे मराठवाड्यातील 750 लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
October 19, 2023 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Water Crisis : जलसंधारण विभागाचा नकार; तरी धाराशिवचे आरक्षित पाणी लातूरला; एका फोनने बदलला निर्णय