रोज 4 टन वृक्षांची कत्तल थांबली, उद्योजकाची नामी शक्कल आणि नफ्यात मोठी वाढ

Last Updated:

धाराशिवमधील एका युवा उद्योजकानं एक पर्यावरणपुरक उद्योगाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय.

+
रोज

रोज 4 टन वृक्षांची कत्तल थांबली, युवा उद्योजकाची नामी शक्कल आणि नफ्यात मोठी वाढ

धाराशिव, 12 नोव्हेंबर: सध्याच्या काळात काही युवा उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. त्यातच अलिकडे पर्यावरणपुरक सौर ऊर्जेच्या वापराकडेही लोकांचा कल वाढतोय. धाराशिवमधील एका उद्योजकानं एक पर्यावरणपुरक उद्योगाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. त्यामुळे रोज 4 टन लाकडांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे विनोद जोगदंड यांनी देशातील पहिलाच सौर ऊर्जेवर चालणारा खवा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. यातून ते रोज 1 टन खव्याची निर्मिती करत असून चांगला नफा मिळवत आहेत.
खवा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून लाकडाची गरज पडते. परंतु हाच खवा सौरऊर्जेवर निर्मिती करण्याचा प्रकल्प उद्योजक विनोद जोगदंड यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील एम आय डीसी मध्ये सुरू केला आहे. या प्रकल्पाची दररोज खवा निर्मिती करण्याची क्षमता चार टनाची आहे तर दररोज एक टन खव्याची निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येते.
advertisement
वृक्षतोड थांबली, नफा वाढला
एक टन खवा निर्मिती करण्यासाठी चार टन लाकूड इंधन म्हणून वापरले जात होते. हे लाकूड आता वापरले जात नाही. सौर ऊर्जेवरील खवा प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड थांबली आहे. तर खव्याची गुणवत्ता देखील चांगली असून खव्याला बाजारात मोठी मागणी आहे. सौर ऊर्जाच्या माध्यमातून हायजेनिक आणि चांगल्या प्रतीचा खवा व पेढा निर्माण होतोय. पॅकिंगच्या माध्यमातून खवा व पेढा लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे बाजारात या खवा व पेढ्याला मोठी मागणी असल्याचे निर्मल मिल्क प्रोडक्शन असोसिएशनचे संचालक विनोद जोगदंड यांनी सांगितले.
advertisement
कामगारांवरली खर्चाची बचत
इंधनावर एक टन खवा निर्मिती करण्यासाठी जोगदंड यांना 20 कामगारांची गरज भासायची आणि दररोज चार टन लाकूड जाळावे लागायचे. तर सौर ऊर्जेवरील या प्रकल्पामुळे केवळ दोन कामगार दररोज एक टन खवा निर्मिती करतात. त्यामुळे इंधनावरील व कामगारावरील होणारा खर्च कमी झाले. तसेच लाकूड जाळल्याने होणारे प्रदुषण आणि वृक्षतोड दोन्ही थांबले आहे, असे जोगदंड सांगतात.
advertisement
सरकारी योजनांचा फायदा
नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. सीएमईजीपी, पीएमईजीपी, स्मार्ट, पोखरा या योजनांच्या माध्यमातून खवा उत्पादक व पेढा उत्पादक, दूध उत्पादक, महिला बचत गट, शेतकरी गट तसेच नव उद्योजकांना अनुदान मिळते. जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शासनाकडून 25 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदानाच्या स्वरूपात सहकार्य होते, असेही जोगदंड यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
रोज 4 टन वृक्षांची कत्तल थांबली, उद्योजकाची नामी शक्कल आणि नफ्यात मोठी वाढ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement