हे आहे महाराष्ट्रातलं शिवकाशी, यंदा कोणते फटाके सर्वात जास्त विकले?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
यंदा फटाका मार्केटमध्ये महागाईच्या झळा जाणवत असून पारंपरिक सुतळी बॉम्ब, भूईचक्रचा ट्रेंड कायम आहे.
धाराशिव, 13 नोव्हेंबर: मराठवाड्याची शिवाकाशी म्हणून धाराशिवमधील तेरखेडाची ओळख आहे. तेरखेडा येथील फटाका मार्केटमध्ये फटाके खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. यावर्षीचा दिवाळी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही एकाच दिवशी असल्याने एक वेगळाच उत्साह पहायला मिळाला. मात्र, यंदा फटाका मार्केटमध्ये महागाईच्या झळा जाणवत असून पारंपरिक सुतळी बॉम्ब, भूईचक्रचा ट्रेंड कायम आहे.
या फटाक्यांना पसंती
तेरखेडा मार्केटमध्ये फटाका खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसली. यंदा पारंपरिक फटाक्यांसह बाजारात फटाक्यांचे नवीन प्रकारही दिसत आहेत. तरीही फुलझडी, सुतळी ॲटम बॉम्ब, भूईचक्र, लसूण बॉम्ब, कलर तोफा, फ्लॉवर पॉट अशा फटाक्यांना ग्राहकांची पसंती कायम आहे, असे फटाका विक्रेते समाधान घुले यांनी सांगितले.
advertisement
ग्राहकांना करावा लागला महागाईचा सामना
यंदा फटाके खरेदी करताना ग्राहकांना महागाईचा देखील सामना करावा लागत आहे. महागाई असल्यामुळे ग्राहकांनी कमीत कमी फटाके खरेदी करण्यावर भर दिलेला पाहायला मिळाला. एकूणच या दिवाळीत फटाक्यांच्या किमती वाढल्या असल्याचे पहायला मिळाले. महागाईमुळे खिशाचा विचार करूनच फटाके खरेदी केल्याचे ग्राहक विजयकुमार आंधळे यांनी सांगितले.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 13, 2023 4:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
हे आहे महाराष्ट्रातलं शिवकाशी, यंदा कोणते फटाके सर्वात जास्त विकले?