घरात कोंडून मतिमंद मुलीवर अत्याचार, धाराशिवमध्ये खळबळ
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कुलूपबंद घरामध्ये कोंडून मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वाशी शहरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या मुलीची सुटका करत आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कुलूपबंद घरामध्ये कोंडून मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाशी शहरात घडली आहे. वाशी शहरात सैलानी बाबा दर्गा परिसरात पडक्या घरात कुलुपबंद खोलीत ठेवलेल्या एका मतीमंद मुलीची सुटका करून वाशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीला या घरातच कोंडून ठेवण्यात आले होते. आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. प्रकरण समोर येताच पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून या मुलीची सुटका केली आहे, आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनं वाशी शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
दरम्यान अद्याप या मुलीची ओळख पटू शकलेली नाहीये, तिच्या हातावर गोंदण्यात आलेल्या मजकुराच्या आधारे पोलीस या मुलीच्या घरच्यांचा शोध घेत आहेत.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
September 19, 2024 11:04 AM IST