advertisement

Maratha Reservation : 'या' गावात संपूर्ण मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद; मोडी लिपी अनुवादकाचा दावा

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका गावात अनुवादकानं केलेल्या दाव्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भात मोठा पुरावा मिळण्याची शक्यता आहे.

News18
News18
धाराशिव, 29 ऑक्टोबर, बालाजी निरफळ : मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने दस्तावेज पाहणी समिती नेमली आहे, या समितीला परांडा तालुक्यातील कंडारी गावात सगळ्याच गावातील व्यक्तींच्या कागदपत्रावर कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदी मोडी लिपीतल्या असून त्याचा अनुवाद केल्यानंतर या नोंदी कुणबीच्या असल्याचं समोर आलं आहे. तसा दावा मोडी लिपीचा अनुवाद करणाऱ्या अनुवादकाकडून करण्यात आला आहे.  जिल्हा प्रशासनाने हा कंडारी गावचा अहवाल शिंदे समितीकडे सोपावला आहे. जिल्ह्यात 468 कुणबी नोंदी आतापर्यंत पाहणी समितीला आढळून आल्या आहेत.
दरम्यान शुक्रवारी मराठा कुणबी आरक्षण समितीच्या अध्यक्षांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील माहिती व पुरावे समितीकडे सादर केले. जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात संपूर्ण यंत्रणा कागदपत्रे तपासणीसाठी कामाला लावली होती. त्यात महसूल, शिक्षण, मुद्रांक, पोलीस, कारागृह, भुमी अभिलेख यासह कर्मचारी यांच्या सेवा पुस्तिका तपासण्यात आल्या. सर्वाधिक कुणबी नोंदी या शिक्षण विभागाकडे आढळल्या आहेत.
advertisement
धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा अशा 459 नोंदी सापडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने तब्बल 40 लाख 49 हजार कागदपत्रे, दस्त व नोंदी यांची तपासणी केली. यात 407 नोंदी या 1948 सालापूर्वीच्या असून 1948 ते 1967 या काळात केवळ 52 नोंदी सापडल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. या नोंदीपैकी कंडारी गावात सगळ्याच मराठा समाजातील व्यक्तींच्या कागदपत्रावर कुणबी असल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maratha Reservation : 'या' गावात संपूर्ण मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद; मोडी लिपी अनुवादकाचा दावा
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement