Dharashiv : आजही इतरांपेक्षा जास्त काम करतो, 92 वर्षीय नेत्यानं काँग्रेसकडे मागितलं तिकीट
- Published by:Suraj
Last Updated:
Maharashtra Assembly Election : धाराशिवमध्ये ९२ वर्षीय काँग्रेस नेत्याने तुळजापूर मतदारसंघातून जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव : विधानसभा निवडणुकीसाठी आता इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. अद्याप मविआ किंवा महायुतीच्या कोणत्याच पक्षाने जागावाटप आणि उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप अंतिम टप्प्यात असतानाच वादाची ठिणगी पडली आहे. यातच आता धाराशिवमध्ये ९२ वर्षीय काँग्रेस नेत्याने तुळजापूर मतदारसंघातून जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलीय.
advertisement
निवडणुकीत वय हा मुद्दा नसून मी इतरांपेक्षा जास्त काम करू शकतो. मी काँग्रेस स्थापनेपासून पक्षात सक्रिय काम करत आहे. माझ्यापुढे अनेक सिद्धांत झाली. आजही मी इतरापेक्षा जास्त काम करतो त्यामुळे वय हा मुद्दा नसल्याचे सांगत मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मधुकर चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. धाराशिवमध्ये तुळजापूर मतदारसंघात त्यांना तिकिट दिलं जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यांना तिकीट दिलं गेल्यास तुळजापुरात मधुकर चव्हाण विरुद्ध भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
advertisement
राणा पाटील यांच्या पत्नीचा लोकसभेला पराभवभाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढल्या होत्या. मात्र त्यांना निवडणुकीत मविआचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी पराभूत केलं होतं. ३ लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने ओमराजे विजयी झाले होते. आता राणा पाटील हे तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2024 10:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv : आजही इतरांपेक्षा जास्त काम करतो, 92 वर्षीय नेत्यानं काँग्रेसकडे मागितलं तिकीट