Uddhav Thackeray : मोठी बातमी! धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंची गाडी अडवली; जोरदार घोषणाबाजी, मराठा आंदोलक आक्रमक का झाले?

Last Updated:

उद्धव ठाकरे हे धाराशिव दैऱ्यावर आहेत. याचदरम्यान मराठा आरक्षण आंदोलकांनी ढोकी येथे उद्धव ठाकरे यांची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी केली.

News18
News18
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिव दैऱ्यावर आहेत. याचदरम्यान मराठा आरक्षण आंदोलकांनी ढोकी येथे उद्धव ठाकरे यांची गाडी आडवत  जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सातत्याने लावून धरा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तसेच  उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आलं आहे.
दुसरीकडे धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान देखील मराठा आंदोलकांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसेच सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी तुम्ही सरकारला जाब विचार अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली. तसेच आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन देखील दिलं.
advertisement
दरम्यान ढोकीमध्ये उद्धव ठाकरे यांची गाडी आडवण्यात आली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.सर्वपक्षीय नेत्यांनी गावात येऊ नये, जरांगे पाटील यांना पाठिंबा, ढोकी गावातून 10 उमेदवार लोकसभेला उभे राहणार अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर असून, त्यांचं शिवसैनिकांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Uddhav Thackeray : मोठी बातमी! धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंची गाडी अडवली; जोरदार घोषणाबाजी, मराठा आंदोलक आक्रमक का झाले?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement