Tuljabhavani Temple : तुळजाभवानीच्या भाविकांसाठी खुशखबर, 20 दिवसांची प्रतिक्षा संपली, आजपासून मोठा निर्णय!

Last Updated:

Dharashiv Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील काम पूर्ण झाल्यामुळे मंदिर संस्थानाने पुन्हा थेट गाभाऱ्यातून दर्शन सुरू केले आहे. त्यामुळे देवीचे जवळून डोळे भरून दर्शन घेण्यासाठी तुळजापूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Tuljabhavani Temple dharma darshan start
Tuljabhavani Temple dharma darshan start
Dharashiv News : महाराष्ट्राची कुलस्वामी तथा शक्तिदेवता असलेल्या धाराशिव येथील तुळजाभवानी मातेच्या (Tuljabhavani Temple) भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार देवीच्या गाभाऱ्यातील प्लास्टरचे काम सुरू असल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून सामान्य भक्तांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना लांबूनच देवीचे दर्शन घ्यावे लागत होते. अशातच आता तुळजाभवानी देवीचे दर्शन 21 दिवसांनंतर भाविकांसाठी पुन्हा सुरू झाले आहे.

थेट गाभाऱ्यातून दर्शन सुरू

आता देवीच्या गाभाऱ्यातील काम पूर्ण झाल्यामुळे मंदिर संस्थानाने पुन्हा थेट गाभाऱ्यातून दर्शन सुरू केले आहे. त्यामुळे देवीचे जवळून डोळे भरून दर्शन घेण्यासाठी तुळजापूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आता मंदिर उघडण्याची वेळ पहाटे चार वाजता करण्यात आली आहे. तर नित्य पुजेता घाट सकाळी सहा वाजता देण्यात येईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
advertisement

पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा 11 जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
advertisement

लेखी अहवाल मिळालाच नाही

दरम्यान, तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहावरील कर्णशिळांना तडे गेल्याच्या मुद्द्यावरून मंदिराचा कळस उतरवण्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांमधील मतभिन्नता समोर आली आहेत. या प्रकरणात अधिकृत लेखी अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाला मिळालेला नाही. यामुळे मंदिराचा कळस उतरवणार की नाही, या निर्णयावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Tuljabhavani Temple : तुळजाभवानीच्या भाविकांसाठी खुशखबर, 20 दिवसांची प्रतिक्षा संपली, आजपासून मोठा निर्णय!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement