मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण: 'आधी विचार संसाराचा', योजनेबाबत महिला म्हणतात...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
या योजनेतून 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 29 जून 2024 रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प विधीमंडळात जाहीर केला. या अर्थसंकल्पात वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत, 44 लाख शेतकऱ्यांना वीज मोफत, पात्र मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत अशा घोषणा करण्यात आल्या. सर्वात चर्चा झाली ती अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची. ही योजना जाहीर करताच अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला.
advertisement
या योजनेतून 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल. 1 जुलै 2024 पासून पात्र महिलांसाठी ही योजना लागू होईल.
हेही वाचा : महिलांना मिळणार 1500 रुपये महिना, पण अट काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील रामेश्वरच्या क्रांती महिला उद्योग समूह अंतर्गत झाडू, खराटे, पिशव्या बनवणाऱ्या महिलांनी या योजनेबाबत आनंद व्यक्त केला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना थेट 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे घर, संसार चालवण्यासाठी महिलांना आर्थिक आधार मिळेल, अशा भावना या महिलांनी आपापल्या शब्दांत व्यक्त केल्या. यातून अनेक महिला आजही सर्वात आधी आपल्या घर, संसाराचाच विचार करतात हे दिसून येतं.
advertisement
दरम्यान, राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली. 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे. तसंच लाभार्थ्यांचं बँक खातं असायला हवं. महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे.
Location :
First Published :
June 29, 2024 10:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण: 'आधी विचार संसाराचा', योजनेबाबत महिला म्हणतात...