महिलांना मिळणार 1500 रुपये महिना, पण अट काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती

Last Updated:

पण ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि त्यासाठी अट काय असणार आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामुळे महिलांना याचा लाभ घेणं सोपं होईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुंबई : अजित पवारांनी आज म्हणजे 28 जूला महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर केला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या अर्थसंकल्पावर टिकून आहे. सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प काय घेऊन येणार आणि त्याचा आपलाला काय फायदा होणार हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये महिलांसाठी अनेक चांगल्या आणि फायद्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या. ज्यामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना अनेक महिलांच्या कामाची आहे. या योजने अंतर्गत महिलांना 1500 रुपये महिना म्हणजे दिड हजार रुपये महिना मिळणार आहे. ज्यामुळे अनेकांना आनंद आहे.
पण ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि त्यासाठी अट काय असणार आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामुळे महिलांना याचा लाभ घेणं सोपं होईल.
advertisement
21 ते 60 वयोगटातील पात्र महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ या योजनेसाठी पात्र आहेत. प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये या योजने अंतर्गत दिले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला 46 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
advertisement
महिलांसाठी अर्थसंक्लपात जाहीर केलेल्या विविध योजना
सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात - मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी
advertisement
दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव आणि आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक.
पिंक ई रिक्षा - 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - 80 कोटी रुपयांचा निधी
"शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये करण्यात आलं आहे.
advertisement
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी ७८ कोटी रुपये नीधी
रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर.
advertisement
‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार-52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ
लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट.
advertisement
महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती.
मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिलांना मिळणार 1500 रुपये महिना, पण अट काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement