राज्यात महिलांना मिळणार 1500 रुपये, शिंदे सरकारची नवी योजना जाहीर

Last Updated:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरु करत आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दिड हजार रुपये दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : विधान सभेच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींची घोषणा करण्यात आली. तसेच अजित पवारांनी माझी लाडकी योजना जाहीर केली. अजित पवारांनी 2024-25 साठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरु करत आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दिड हजार रुपये दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला 46 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

२०२४-२५ वर्षाचा अतिरिक्त अर्थ संकल्प सादर करतोय, असं म्हणत अजित पवारांनी संत तुकारामांचा अभंग सादर करत बजेट मांडायवा सुरुवात केली.
advertisement
विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या आहेत, ही हजार वर्षांची परंपरा आहे. भक्तिमार्गाची नाळ जोडल्याची जाणीव महाराष्ट्राला आहे. युनेस्को कडे नोंद व्हावी म्हणून प्रस्ताव पाठवत आहोत. असं देखील अजित पवार म्हणाले.
देहू आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील सर्व वारकऱ्यांची तपासणी केली जाणार आहे पालखी महामार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे.
advertisement
केंद्र सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यावर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लागेल अशी अपेक्षा बाळगतो. असं देखील पुढे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
या योजनेत वय २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे. त्यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटींची तरतूद केली जाईल. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
advertisement
ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ८० कोटींचा निधी उपलब्ध करणार. सामुदायिक विवाहात १० हजारांवरून २५ हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
जुन्या रुग्णवाहिकांऐवजी नव्या रुग्ण वाहिका देणार.
हर घर जल, योजनेत नळ जोडणी केली जाणार आहे.
स्वयंपाकघरात स्वच्छ इंधनासाठी एलपीजी पुरवठा वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं, त्यानुसार प्रयत्न केलं जाणार आहे.
advertisement
प्रत्येक पात्र कुटुंबाला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजनेची घोषणा केली.
अंगणवाडी सेविका यांना १ लाख रुपयांचा लाभ देण्यात येत आहे.
बचत गटांच्या निधीच्या रक्कमेत १५ हजारांहून ४० हजार रुपये करण्यात येत आहे.
या वर्षात २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.
८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षणात १०० टक्के प्रतिपूर्ती करणार
advertisement
मागासवर्गीय कुटुंबातील मुलींसाठी मोठी घोषणा
स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी
या अंतर्गत नमो शेतकरी निधी, एक रुपयांत पीक विमा देतोय
नैसर्गिक नुकसानभरपाई म्हणून २२ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे
२४ लाख शेतकऱ्यांना मदत दिली आहे
गाव तिथे गोदाम योजना जाहीर केली. त्यासाठी नवे गोदाम निर्मिती करताना जुन्या गोदामांची डागडुजी केली जाणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात महिलांना मिळणार 1500 रुपये, शिंदे सरकारची नवी योजना जाहीर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement