पेढ्यातून गुंगीचं औषध, ऑन कॅमेरा अत्याचार करत उकळले 60 लाख, धुळ्यात मुख्यध्यापकाचं भयंकर कृत्य

Last Updated:

एका प्रतिष्ठित शाळेतील मुख्याध्यापकाने एका महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

News18
News18
Crime in Dhule: धुळे शहरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रतिष्ठित शाळेतील मुख्याध्यापकाने एका पीडित महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून जवळपास ६० लाख रुपये उकळले आहेत.
या प्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला आरोपी सुकलाल बोरसे याने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या मदतीमुळे दोघांमध्ये ओळख वाढली. याच ओळखीचा गैरफायदा घेत, १७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बोरसे हा महिलेच्या घरी गेला. तिला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. महिलेची शुद्ध हरपताच आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
advertisement

सव्वा दोन वर्ष ब्लॅकमेल करत ६० लाख उकळले

आरोपीनं आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमक्यांच्या आधारावर त्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये इतकी मोठी रक्कम उकळली. तसेच तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. मागील सव्वा दोन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता.
advertisement
याव्यतिरिक्त, आरोपी मुख्याध्यापकाने पीडित महिलेचे सही असलेले पाच ते सहा धनादेश (चेक) देखील स्वतःकडे ठेवून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेरीस, आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने हिम्मत दाखवत पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठले आणि मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याच्याविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पेढ्यातून गुंगीचं औषध, ऑन कॅमेरा अत्याचार करत उकळले 60 लाख, धुळ्यात मुख्यध्यापकाचं भयंकर कृत्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement