advertisement

नागपुरातील दीक्षाभूमीच्या अध्यक्षांनी महिलेवर उगारला हात, धक्कादायक घटनेचा VIDEO

Last Updated:

नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी एका महिलेवर हात उगारल्याचा आणि अंगावर धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18
News18
नागपूर : नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी एका महिलेवर हात उगारल्याचा आणि अंगावर धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिला महाविद्यालयात झालेल्या गैर व्यवहाराबद्दल जाब विचारायला आल्या होत्या. याच वेळी दीक्षाभूमीच्या अध्यक्षांनी एका महिलेवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या सगळा प्रकार एका अन्य महिलेनं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
भंते सुरई ससाई असं हात उगारणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करताना स्मारक समितीच्या अध्यक्षांनीच हात उगारल्याने हे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले आहे. महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांतील काही महिला दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांना भेटायला गेल्या होत्या.
advertisement
मात्र चर्चेदरम्यान भंते ससाई यांनी संबंधित महिलांवर हात उगारला आणि त्यांच्या दिशेने धाव घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे भंते सुरई ससाई यांच्यावर टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी नागपूर विद्यापीठाने स्थापन केलेल्या चौकशी समितीचे सदस्य बुधवारी महाविद्यालयात गेले होते. आंबेडकरी समाजातील काही संघटना समिती सदस्यांना भेटण्यासाठी तेथे गेल्या होत्या. सुरुवातीला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या समितीची भेट घेतली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा पांन्हेकर यांची भेट घेण्यात आली.
advertisement
यानंतर संबंधित महिलांच्या इच्छेनुसार प्राचार्या पान्हेकर यांनी त्यांना स्मारक समितीचे अध्यक्ष भंते ससाई यांच्याकडे नेले. या महिलांनी आपल्या मागण्या भंते ससाई यांच्यासमोर मांडल्या. मात्र त्यांचे वर्तन अत्यंत उर्मट आणि एकतर्फी असल्याचे या शिष्टमंडळातील ज्योती आवळे यांनी सांगितले. भंते ससाई यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप भंते यांची कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नागपुरातील दीक्षाभूमीच्या अध्यक्षांनी महिलेवर उगारला हात, धक्कादायक घटनेचा VIDEO
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement